मराठीतील थर्ड क्लास सुविचार
मराठीतील आजपर्यंतचे सर्वांत थर्ड क्लास सुविचार - 1) अज्ञानात माणूस सुखी असतो. 2) साधी राहणी उच्च विचारसरणी. अज्ञानात माणूस सुखी कसा राहील? अज्ञान दूर करून तो सुखी होऊ शकत नाही का? दुसरे, जर तुमचे विचार उच्च असतील तर तुम्हाला उच्च पद्धतीने राहण्यास काय अडचण आहे? अज्ञानात माणूस सुखी असतो म्हणणे म्हणजे , त्याला अज्ञान म्हणजे सत्याची, वास्तवाची जाणीव नसणे असा त्याचा अर्थ होतो. जेंव्हा माणसाला अन्याय, शोषण किंवा दु:खाची जाणीव होत नाही, तेव्हा त्याला ते दु:ख नाही, असा अर्थ या सुविचारात दडलेला आहे. वरवर पाहता हे असले सुविचार काही काळापुरते धीर देतात, परंतु पुन्हा काय? कारण, सत्याच्या जाणिवे पासून दूर पळून जाणे हे कधीही खूप काळासाठी सुख देणारे नसते. याउलट अज्ञान दूर करून जे सत्य आपल्यालाला ज्ञात होईल ते खरे सुख आहे. उगाच काहीतरी बोगस सुविचार तयार करायचे, म्हणजे एखाद्याने जसे आहे तसे अज्ञानात सुखी मानून स्वतःला सांत्वन देत रहायचे. त्याचप्रमाणे, ते साधी राहणी उच्च विचारसरणीचा सुविचार, हाही सुविचार असाच वरकरणी मोहक आणि सुंदर. उलट मी तर म्हणेल ह्या सुविचाराला Follow करणारे अतिशय जातीवादी असतात. सा...