मराठीतील थर्ड क्लास सुविचार

मराठीतील आजपर्यंतचे सर्वांत थर्ड क्लास
सुविचार -

1) अज्ञानात माणूस सुखी असतो.
2) साधी राहणी उच्च विचारसरणी.

अज्ञानात माणूस सुखी कसा राहील? अज्ञान दूर करून तो सुखी होऊ शकत नाही का? दुसरे, जर तुमचे विचार उच्च असतील तर तुम्हाला उच्च पद्धतीने राहण्यास काय अडचण आहे? अज्ञानात माणूस सुखी असतो म्हणणे म्हणजे , त्याला अज्ञान म्हणजे सत्याची, वास्तवाची जाणीव नसणे असा त्याचा अर्थ होतो. जेंव्हा माणसाला अन्याय, शोषण किंवा दु:खाची जाणीव होत नाही, तेव्हा त्याला ते दु:ख नाही, असा अर्थ या सुविचारात दडलेला आहे. वरवर पाहता हे असले सुविचार काही काळापुरते धीर देतात, परंतु पुन्हा काय? कारण, सत्याच्या जाणिवे पासून दूर पळून जाणे हे कधीही खूप काळासाठी सुख देणारे नसते. याउलट अज्ञान दूर करून जे सत्य आपल्यालाला ज्ञात होईल ते खरे सुख आहे. उगाच काहीतरी बोगस सुविचार तयार करायचे, म्हणजे एखाद्याने जसे आहे तसे अज्ञानात सुखी मानून स्वतःला सांत्वन देत रहायचे. त्याचप्रमाणे, ते साधी राहणी उच्च विचारसरणीचा सुविचार, हाही सुविचार असाच वरकरणी मोहक आणि सुंदर. उलट मी तर म्हणेल ह्या सुविचाराला Follow करणारे अतिशय जातीवादी असतात. साध्या राहणीमानाचे विचार पटून देताना गांधी, कलाम, सुधा मूर्ती अमके टमके सगळे Privileged लोकांचे तुम्हाला उदाहरणे देतात. काय गरज आहे असल्या उदाहरणाची? कारण एकच , Under Privileged असलेल्या लोकांनी प्रगती साधू नये. तुम्ही जसे आहात तसेच रहा हे अप्रत्यक्षरित्या तुम्हाला सुचविले जाते. उच्चभ्रू लोक साधे राहणीमान Show करून Under Privileged लोकांवर सामाजिक आणि मानसिक दबाव आणतात आणि आपण त्याला बळी पडतो. इथे तुम्हाला फुले, शाहू, आंबेडकर यांचे उदाहरण दिले जाणार नाही. कारण, ह्यानी कधीही असल्या विचारांना प्रोत्साहन दिले नाही. उलट, फुले, शाहू आणि आंबेडकर यांचे पोषाख बघा, इंग्लिश भाषेवरील प्रभुत्व बघा. ह्यांनी नेहमीच उच्च राहणी आणि उच्च विचारसरणी बाळगण्याचे सांगितले आहे. समाजातील गरीब, शोषित लोकांनी भौतिक प्रगती करू नये म्हणूनच असल्या सुविचारांना जातीवादी लोकांनी जन्माला घातले. म्हणजे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण करायचा आणि स्वतःचे Priviledge तसेच ठेवायचे. मुळात हे कळले पाहिजे, ठरवुन साधे राहणे आणि पैसा नाही म्हणून साधे राहणे ह्या दोन्ही बाबींमध्ये फरक आहे. ठरवुन साधेपणाने रहायचे Privileged तुटपुंज्या पगारात घर चालवणार्‍या व्यक्तीकडे कधी नसते. साधी राहणी उच्च विचारसरणीवाले लोक आपली श्रीमंती, प्रतिष्ठा लपवून साधेपणाचा आदर्श दाखवत असतात आणि त्यातून एक प्रकारची सामाजिक ब्लॅकमेलिंग करण्याची त्यांची खेळी सुरू असते. इतकेच जर हे साधेपणाचे उदात्तीकरण करतात तर मग हे संपत्तीधारक संपत्तीचे समान वितरण का करत नाहीत? समान संधी आणि अधिकार का देत नाहीत? यावर तोंड उघडायला देखील तयार नसतात आणि खोटा देखावा करायला मात्र पुढे पुढे. साधे राहणीमान देखील ह्या उच्चभ्रू लोकांचे Privileged असते जे प्रगती साधू इच्छिणाऱ्या लोकांना महाग पडते. गांधी, कलाम, टाटा, सुधा मूर्ती यांचे साधे राहणीमान हे त्यांचे Privileged च आहे. हे असल्या साधेपणाचा देखावा करणाऱ्या जातीवादी लोकांनी त्याचेच उदात्तीकरण करुन समाजात सामाजिक दडपण तयार केले आहे. त्यामुळे , असल्या थर्ड क्लास भ्रामक, पाखंडी सुविचारांच्या नादी न लागता, आपले अज्ञान दूर करून सुखी राहणे आणि साधेपणाने न राहता उच्च विचारांसोबत उच्च राहणीमानाने राहिले तरच असल्या दडपशाहीला हाणून पाडता येईल.

Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली