गांधीवाद : दलितविरोधी विचारांचा इतिहास

आधुनिक राजकारणात रामराज्याची संकल्पना मांडणारे , भगवद्गीतेला प्रचलित वर्णाश्रम धर्माचे कट्टर समर्थक , आणि धर्माच्या आधारावर देशाच्या फाळणीला संमती देणारे , परंतु देशांतर्गत दलितांच्या स्वतंत्र मतदारसंघाला ठाम विरोध करणारे , सनातनी हिंदू धर्माचे कट्टर प्रसारक गांधीजी हे नेहमीच समाजाच्या तळागाळातील वंचित आणि दलितांच्या हक्कांना दुय्यम स्थान देत आले. राष्ट्रीय चळवळीचे प्रणेते असणारे , भारतातील सामाजिक सुधारणांना डावलून होणारी राष्ट्रीय चळवळ , जिथे भारतातच एका वर्गाला पाणी पिण्याची परवानगी नसताना , तरीही गांधीजी स्वतःला सामाजिक सुधारक म्हणून मांडताना , वारंवार दलितांच्या , शोषितांच्या राजकीय , सामाजिक , आणि धार्मिक हक्कांसाठी उभे राहणाऱ्या चळवळींचा विरोध केला. गांधीजींनी दलितांना 'हरिजन' म्हणजेच 'हरिची मुले' असे संबोधून त्यांचे अस्तित्व कमी लेखले , त्यांना स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची इच्छा आणि क्षमता नाही अशी धारणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दलितांना 'हरिची मुले' संबोधून त्यांचे स्व:ताचे व्यक्ती म्हणून अस्तित्व नाकारणारे गांधी , दलितांच्या स्वतंत्र ओळखीकडे फक्त 'गावातील खालचे घटक' म्हणून पाहत होते , आणि म्हणूनच त्यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स दरम्यान दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याच्या बाबासाहेबांच्या मागणीला कडाडून विरोध केला. त्याऐवजी , दलितांनी हिंदू समाजात राहूनच आपली स्थिती सुधारावी , ही त्यांची भूमिका होती , जणू दलितांना स्वतंत्र ओळख स्वीकारण्याचा अधिकारच नव्हता. गांधीजींच्या अट्टहासाने आजही दलित लोक राजकारणात स्वतंत्रपणे उभे राहू शकत नाहीत. रामराज्याची संकल्पना मांडताना गांधीजींनी केवळ वर्णाश्रम धर्माच्या कल्पनांनाच प्रोत्साहन दिले , ज्यात दलितांना कायमच नीच ठेवले गेले. हेच गांधीजी पुढे फाळणीच्या वेळी , मुस्लीम समाजाच्या राजकीय स्वतंत्रतेला परोक्ष समर्थन देतात , पण देशांतर्गत दलितांचा राजकीय आवाज आणि आणि स्वतंत्र मतदारसंघ याला त्यांनी विरोध करणे म्हणजे , गांधींची राजकीय भूमिका दलितांच्या पूर्ण अधिकारांना मान्यता देणारी नव्हती. याचा अर्थ असा की गांधीजींसाठी धर्माच्या आधारावर विभाजन होऊ शकते , पण दलितांना सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य हवे असले तरी , ते मिळू नये , ही त्यांची दुटप्पी भूमिका स्पष्ट होती. हेच विचार पुढे नेणारे गांधीवादी आजही बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुलना करून गांधींचे महिमामंडन करत , दलितांच्या हक्कांचा अवमान करतात. ओढून ताणून गांधी-आंबेडकर कसे चांगले , दाखवण्याचा बाष्कळ प्रयत्न करत असतात. इतिहासातील एकांगी बाजू मांडून , नसलेले महात्मापण सिद्ध करतात. आंबेडकर आणि गांधीजींमधील वास्तविक संघर्ष हा केवळ राजकीय नव्हता , तर तो तत्त्वज्ञानाचा संघर्ष होता , एक असा संघर्ष जो मानवतेच्या हक्कांसाठी आणि वर्णव्यवस्थेच्या विरोधात होता. गांधीजींचे विचार हे नेहमीच दलितांना मूळ सामाजिक संरचनेतच ठेवून , वर्णाश्रम व्यवस्थेचे समर्थन करणारे होते. गांधीजींचे 'रामराज्य' म्हणजे एक असा समाज जिथे दलित , मागास , आणि वंचितांचा आवाज केवळ वरच्या वर्गाच्या इच्छेनुसार चालावा , अशीच त्यांची मांडणी शेवटपर्यंत होती. गांधींचा प्रभाव आणि त्यांची प्रतिमा नेहमीच सत्ताधारी वर्गाच्या सोयीस्कर राजकारणासाठी वापरली गेली आहे. या गांधीवाद्यांनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की गांधीजींचे विचार , सत्य , अहिंसा आणि साधेपणा केवळ भाषणांपुरते मर्यादित आहेत की ते प्रत्यक्षात उतरवले जातात? गांधीजींनी रामराज्याची कल्पना मांडली , त्याच कल्पनेच्या नावावर आजही दलित आणि वंचितांना समाजाच्या सर्व स्तरांवर तिरस्कार , बहिष्कार , आणि अत्याचारांना सामोरे जावे लागते. या परिस्थितीत हे गांधीवादी लोक काय करत आहेत? आज गांधी जयंतीनिमित्त गांधीवादी लोकांनी 'गांधी कभी मरा नहीं करते' यापुढे जाऊन गांधीजी बद्दल इतिहासातील त्यांची दलितविरोधी भूमिका उघडपणे मान्य करावी. आधुनिक राजकारणात गांधीजींची संकल्पना नेहमीच दलितविरोधी राहिली आहे , आणि म्हणूनच त्यांच्या विचारांचा अभ्यास करताना त्यांचा खरा चेहरा समजून घेणे गरजेचे आहे. गांधीवादी विचारधारा ही एका विशिष्ट वर्गासाठी अधिक सोयीची आणि वंचितांच्या दृष्टीने केवळ वरकरणीच परिवर्तनाची भाषा बोलणारी आहे , हे नाकारता येत नाही. 'गांधी कभी मरा नहीं करते' फक्त डॉयलॉगबाजी करत राहून सत्य दडवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न गांधीवादी लोकांनी करू नये. गांधी जयंती निमित्त हिंदुत्ववादी , हिंदु धर्मिय , हिंदु नास्तिक , पुरोगामी हिंदू , नास्तिक पुरोगामी हिंदू , कट्टरपंथी हिंदू , प्रगतिशील हिंदू , साम्यवादी हिंदू , आणि त्यांच्या खोट्या आदर्शांना आदर्श मानणार्‍या सर्व प्रकारच्या हिंदूना शुभेच्छा! जय भीम!

Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली