30 जानेवारी...
30 जानेवारी 1948 ज्या दिवशी सर्व जग एका शोकाकुल वातावरणात निघून गेले. क्षणार्धात काय झाले हे, कुणाला काही कळलेच नाही. आपल्या सोबत असणारे गांधी, पापणी लवण्याच्या आत कसे निघून गेले? आभा आणि मनूच्या खांद्यावर हात ठेवुन, प्रार्थनास्थळी जाणारे गांधी अचानक कोसळले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो देह, एक नीरव शांतता घेऊन निपचित पडला होता. तो, हडकुळा देह शेवटी जातानाही सांगत होता, अहिंसा हाच मोठा धर्म आहे... बुद्धाची शांतता त्या, देहावर जाणवत होती. समुद्रलाही, लाटा जोरजोराने लाटा धडकाव्यात... आणी त्या लाटेत आपण कुठेतरी निघून जावे. असेच हे वातावरण होते. गांधीजींचा मृत्यू म्हणजे आपला मृत्यू आणि देशाचा मृत्यू अशी जनभावना उमळू लागली. नेहमीप्रमाणे वेळेवर जाणाऱ्या गांधीजींना, त्या दिवशी प्रार्थना स्थळी जाण्यासाठी 10 मिनिट उशीर झाला. वेळेच्या बाबतीत गांधीजी कधीच चुकत नसत. प्रत्येक, कामात वेळ पाळणारे गांधीजी मात्र त्या दिवशी वेळ पाळण्याचे चुकलेत. इकडे दिल्लीतील बिर्ला भवन संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी, प्रार्थनास्थळ खचाखच भरलेले होते. तत्पूर्वी , बिर्ला भवनमध्ये गांधीजी नुकत्याच स्वतंत...