बाबासाहेब आणि आदिवासी लोक...


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करण्यासाठी त्यांनी आदिवासी लोकांसाठी काय केले? असा प्रश्न विचारून हिंदुत्ववादी लोक मुद्दाम, खोडसाळपणे आणि निर्बुद्धपणे, तर्कहीन, बिनबुडाचे आरोप त्यांच्यावर नेहमीच करतात. कोणत्याही पुस्तकाचे पान टाकून, समाजात विष कालवणाऱ्या आणि आशा लोकांवर विश्वास ठेवणारे लोक तर त्यापेक्षा जास्त महामूर्ख वाटतात. आदिवासी लोकांसाठी काहीच केले नाही , सर्व काही स्वतःच्या जातीसाठी केले, असे आरोप करून तुम्हाला काय साधायचे असते? आदिवासींच्या मनात भेदभाव निर्माण करून, स्वतः मजा बघायची. असेच ना? वाचा आता...

आदिवासी लोकांबद्दल डॉ. आंबेडकरांनी आपल्या ॲन्हिलेशन ऑफ कास्ट पुस्तकात काय म्हटले वाचा -

“ संस्कृतीच्या मध्यभागी जगणारे तेरा लाख लोक अद्यापि रानटी अवस्थेत आहेत आणि पारंपरिक गुन्हेगारीचे जीवन कंठत आहेत. परंतु हिंदूंना त्याची कधीच लाज वाटली नाही. हे दृश्य माझ्या मते अगदीच अद्वितीय आहे. या लाजिरवाण्या स्थितीचे कारण काय? या आदिवासींना सुसंस्कृत करण्याचा आणि त्यांना चरितार्थासाठी अधिक सन्माननीय मार्गावर आणण्याचा कोणताही प्रयत्न का झाला नाही? आदिवासींच्या या रानटी अवस्थेसाठी त्यांना जन्मजात मतिमंदपणा बहाल करून हिंदू कदाचित तेच त्याचे कारण देऊ पाहतील. हिंदूंनी त्यांना सुसंस्कृत करण्याचा, त्यांना वैद्यकीय मदत देण्याचा, त्यांची सुधारणा करण्याचा, त्यांना चांगले नागरीक बनविण्याचा कोणताही प्रयत्न न केल्यामुळे आदिवासी हे रानटी राहिले, हे कदाचित ते मान्य करणार नाहीत परंतु समजा ह्या आदिवासींसाठी ख्रिस्ती मिशनरी जे करीत आहेत ते करण्याची हिंदूंची इच्छा असती , तर ते तसे करू शकले असते काय? मी म्हणतो, नाही. आदिवासींना सुसंस्कृत करायचे याचा अर्थ त्यांच्यामध्ये राहून, मित्रत्वाची भावना जोपासून , सारांश त्यांच्यावर प्रेम करून त्यांना आपले स्वतःचे म्हणून त्यांचा अंगीकार करावयाचा, असा आहे. असे करणे हिंदूला कसे शक्य आहे? त्याचे संपूर्ण जीवन म्हणजे त्याची जात जपण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. जात ही त्याची मौल्यवान मालमत्ता आहे. तिचा त्याने काहीही करून बचाव हा केलाच पाहिजे. वैदिक काळातील आर्यांचे तिरस्करणीय अवशेष असलेल्या आदिवासींबरोबर संबंध प्रस्थापित करून तो जात गमावण्यास तयार होऊ शकत नाही. नाश पावलेल्या माणुसकीसाठी हिंदूला कर्तव्याची भावना शिकवली जाऊ शकत नाही असे नाही, परंतु अडचण अशी आहे की, त्याच्या जातीची जपणूक करण्याच्या त्याच्या कर्तव्यावर मात करण्यास त्याला त्याची कोणतीही कर्तव्यभावना समर्थ करू शकत नाही. त्यामुळे हिंदूने न शरमता किंवा पश्चात्तापाची किंवा अनुतापाची कोणतीही भावना न वाटू देता त्याच्या संस्कृतीमध्ये रानटी माणसाला रानटीच राहू दिले...”

डॉ. आंबेडकरांनी आपल्या पुस्तकात आदिवासींबद्दल, त्यांच्या दयनीय अवस्थेला सर्वस्वी कोण जबाबदार आहे, त्याबद्दल भाष्य करणारा हा एक उतारा हिंदुत्ववादी, मनुवादी लोकांच्या गालावर सणसणीत चपराक आहे.

आता वाचा डॉ. आंबेडकरांनी आदिवासींच्या विकासासाठी दिलेले योगदान - 

1) इ. स. 1927 मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी यांच्या अभ्यासासाठी सरकारला त्वरित कमिशन नेमायला भाग पाडले.

2) इ. स. 1928 ते इ. स. 1930 या कालावधीत खेडोपाडी जाऊन, आदिवासी पाड्यांवर, जाऊन ओ. बी. एच स्टार्ट कमिशनचा रिपोर्ट बाबासाहेबांनी तयार केला.

3) 23 ऑक्टोबर 1928 मध्ये त्यांनी पहिल्यांदा सायमन कमिशनसमोर आदिवासींना मतदानाचा अधिकार दिला पाहिजे असे सांगितले.

4) त्याचप्रमाणे ऑक्टोबर 1933 मध्ये जे. एच. हट्टन यांच्यापुढे त्यांनी आदिवासींना राज्यघटनेत आणून त्यांना विशेष संरक्षण दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

5) कमिशनच्या रिपोर्टमध्ये आदिवासींच्या हितासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना घटनात्मक संरक्षण देण्याची ब्रिटिश सरकारला केलेली मागणी मान्य देखील करायला लावली. 

6) राज्य घटना लिहिताना आदिवासींना सर्वाधिक घटना संरक्षण पुरवले जाईल , अशा तरतुदी केल्या.
आणखी डोक्यात प्रकाश पडला नसेल तर, कलम 13 ते 51 आणि कलम 330, 342, 371 बघा.

7) सरकारी नोकऱ्यातील राखीव जागा बजेटमध्ये राखीव निधी , ट्रायबल एरियासाठी स्वतंत्र तरतुदी , शैक्षणिक आरक्षण , आदिवासी संस्कृतीचा अभ्यास , त्यातील महत्वाच्या गोष्टी जपल्या जाव्यात म्हणून केलेले संस्थात्मक काम , ग्रामपंचायत ते संसदेतील आरक्षण. Etc. 

बाबासाहेबांनी भारतीय संविधानात आदिवासी अस्मिता आणि संस्कृतीच्या आधारे आदिवासींना घटनात्मक अधिकार आणि संरक्षण सुनिश्चित केले.

डॉ. आंबेडकरांवर आरोप करण्याआधी , हेडगेवार
गोळवलकरांचे कशात काही योगदान आहे का यावर जरा विचार करा. आदिवासींबद्दल जास्त कळवळा फुटला असेल तर पंतप्रधानाना मणिपूर मध्ये जायला सांगा. रामाचा आशीर्वाद घेण्याआधी सामूहिक बलात्कार झालेल्या 
“आदिवासी” महिलांना भेटून त्यांचा आशीर्वाद घ्यायला सांगा, निदान आशीर्वाद तरी लागेल. भाजपाचे, संघाचे कशातच कुठेही योगदान नाही, अन् ज्यांनी योगदान दिले त्यांच्यावर अभ्यास न करता, बुद्धीहीन प्रश्न विचारायचे. अकलेचे वांदे वरून अक्कलही शून्य ! जय श्रीराम, जय श्रीराम करण्यापेक्षा इतिहास नीट वाचला तर निदान प्रश्न तरी बरोबर पडतील.
शिव - फुले - शाहू - आंबेडकर यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्याआधी संघाचे बांडगूळ काय करत होते , हे शोधावे...
म्हणजे इतिहासाचे नीट आकलन होईल. 











Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली