अडगळीतील सुधारणावादी ब्राम्हण स्त्रियां...

निर्बुद्ध, कुंठित, कुत्सितपणे, कपटी वागणाऱ्या आजच्या ब्राम्हण स्त्रिया संविधानापेक्षा मनुस्मृतीचा गर्व करतात...! विचारांनी सडलेल्या बुद्धीच्या जोरावर सावित्रीबाई फुलेंवर शंका घेतात, शेण फेकल्याचे पुरावे मागतात, शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोधली का, डॉ. आंबेडकरांनी इंग्रजांना साथ दिली का, असले नीच, हलकट, घाणेरडे व निर्लज्ज प्रश्न विचारतात. लाज वाटते का, शूद्र लोकांनी समाजसुधारणेचा पाया उभा केला म्हणून स्विकारायला? 

आजच्या असल्या ब्राम्हणामुळे, इतिहासातील चांगले ब्राम्हण देखील अडगळीत पडलेल्या अवस्थेत आहेत. समाजसुधारक असलेल्या ब्राम्हणांचा हेच ब्राम्हण द्वेष करतात व त्यांच्या कर्तुत्वावर पाय फिरवतात. ब्राम्हणी वर्चस्वाखाली काही ब्राम्हण कधीच दबले नाही व सुधारणा चळवळीत त्यांनी देखील हिरिरीने भाग घेतला मग ती स्त्री असो की पुरुष. आधुनिक काळात ब्राम्हणी, भटाळलेल्या स्त्रिया सावित्रीबाईंना तर सोडा, ब्राम्हणी सुधारणावादी स्त्रीला देखील आदर्श मानत नाहीत. मनुवादी, ब्राह्मण्य, कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी जोपासण्यात धन्यता मानतात. 

सुधारणावादी चळवळीला विरोध करण्यासाठी ब्राम्हण नेहमीच आघाडीवर होते व ज्या ब्राम्हणांनी सुधारणा केल्यात त्यांना याच ब्राम्हणांनी वाळीत टाकले. 

उदा : संत मुक्ताबाई , संत बहिणाबाई चौधरी , पंडिता रमाबाई , रमाबाई रानडे. इ. 

सुधारणावादी ब्राम्हण स्त्रिया आजही आदर्श आहेत आणि विशेष म्हणजे कुठलाही समाज त्यांची जात बघून त्यांना मानत नाही. 

या चार स्त्रियांचे उदाहरण घ्या - 

1) संत मुक्ताबाई - 

ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण, आई वडीलांच्या देह त्यागानंतर कुटुंबाची जबाबदारी तोंडावर पडली असताना समर्थपणे मराठीतील साहित्याचा वारसा समृद्ध करणार्‍या संत मुक्ताबाई. विचारांनी साधी पण परखड. बालपणीच समाजाचे कठोरपण अनुभवले, सर्व मोठ्या भावंडाना मायेचा आधार दिला. मराठीतील पहिल्या कवयित्री असणार्‍या मुक्ताबाईंनी जवळपास चाळीस अभंग लिहिले आहेत, मुख्यता “ताटीचे” अभंग. “जेणे संत व्हावे तेणे लोक बोलने सोसावे”, अशा शब्दांत मुक्ताबाईंनी संताची व्याख्या केली. लोकांच्या तुच्छतेने, वाळीत टाकण्यामुळे, जाचाने, त्रासाने बालपण करपले. त्यामुळे, प्रौढ वयातच गंभीर, सोशीक व समंजस बनल्या. ज्ञानाचा कुठलाही अधिकार नसताना, तत्कालीन संतानी त्यांचा ज्ञानाचा अधिकार मान्य केला. समजाच्या उग्र, कठोर नियमांना, सामोरे जात, समाज व्यवस्थेचे अभंगातून अनुभव कथन केले. रचलेल्या अभंगाची संख्या छोटीशी असली तरी, मुक्ताबाईंच्या विचारांची मोठी प्रगल्भता त्यातून दिसून येते. मुक्ताबाईंचा जन्म ब्राह्मण कुटुंबांत झाला असूनदेखील, ब्राम्हणांनीच त्यांना छळले. कुटुंबातील सर्व भावंडानी ब्राम्हणी संकटांचा सामना करत, आपल्या अभंगवाणीतून संत परंपरेचा मोठा पाया उभा केला. 

2) बहिणाबाई चौधरी - 

ब्राम्हण कुटुंबात जन्म झाला व तरुण वयातच एका विधुराशी लग्न झाल्यामुळे शारीरिक व शाब्दिक अत्याचाराला बळी पडलेल्या संत बहिणाबाईंनी स्त्री दुःखाचे अभंग रचले. शूद्र संत तुकारामांना बहिणाबाईंनी गुरू मानल्यामुळे ब्राम्हणांनी वेड्यात काढले. बहिणाबाईंनी भक्ती मार्गाची कास धरू नये म्हणून, उग्र झालेल्या नवऱ्याने मारले, त्रास दिला, मारहाण केली, गोठ्यात डांबून ठेवले. शेवटी तीन महिन्यांची गर्भवती असतांना पतीने सोडून देण्याचा निर्णय घेतला, परंतु तिची विठ्ठलाप्रती भक्ती पाहून पतीला शेवटी पश्चाताप झाला. पतीचा मानसिक व शारीरिक छळ सहन केला, लोकांनी देखील त्यांच्या वागण्याचा प्रसंगी चुकीचा अर्थ लावला. 

“ स्वतःला (दुसऱ्या) देवाला समर्पित करण्यापेक्षा पतीची सेवा करणे अधिक महत्त्वाचे आहे.” 

बहिणाबाईंच्या मते,

“मी माझ्या पतीची सेवा करेन – तो माझा देव आहे …

माझे पती माझे गुरू आहेत ; माझा नवरा हा माझा मार्ग आहे.” 

बहिणाबाईंनी पतीच्या त्रासाला सहन करूनही, पतीला स्वीकारण्याचा मोठा उदारपणा दाखवला. स्थानिक ब्राह्मणाच्या त्रासाला कंटाळून, नैराश्यातून अनेकदा त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. सांसारिक जीवनातील दुःख, पती-पत्नी मधील संघर्ष, विठ्ठल भक्ति बहिणाबाईंच्या अभंगाचा पाया आहे. ब्राम्हण कुटुंबात जन्माला येऊन, कोणत्याही समाजिक परंपरेचा त्यांनी अपमान केला नाही. स्त्रीच्या दुःखाचे उत्तर जगाला दोष देण्यात नाही म्हणणाऱ्या बहिणाबाईं आदर्श आहेत. 

3) पंडिता रमाबाई - 

ब्राम्हण समाजातील पहिल्या आधुनिक स्त्री-समाजसुधारक पंडिता रमाबाई. रमाबाईच्या “ द हायकास्ट हिंदू वुमन ” या पुस्तकाने हजारो वर्षाच्या ब्राम्हणी पितृसत्ता विरुद्ध स्त्रियांच्या आधुनिक बंडाची सुरुवात केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी रमाबाईंच्या स्त्री-पुरुष समानतेच्या लढ्याला पाठिंबा दिला. 

रमाबाईनी ख्रिश्चन धर्म स्वीकारून हिंदू धर्माला मोठे आव्हान दिले होते. ब्राह्मण असून, समाजिक दृष्ट्या बहिष्कृत कनिष्ठ जातीतील मेधवीशी लग्न करण्याचा निर्णय घेताना तिने तिच्या स्वतःच्या उच्च जातीचा विचार आड येऊ दिला नाही. सुधारवादी ब्राम्हो समाज संघटनेत सामील झाल्या व जाती व्यवस्थेला विरोध केला. 

रमाबाईंच्या मते - 

“शंभरपैकी नव्वद प्रकरणांमध्ये या देशातील सुशिक्षित पुरुषांचा स्त्रीशिक्षण आणि स्त्रियांच्या योग्य स्थानाला विरोध आहे. स्त्रियांमध्ये त्यांना थोडासा दोष दिसला तर ते मोहरीच्या दाण्याला डोंगरात वाढवतात आणि स्त्रीचे चारित्र्य बिघडवण्याचा प्रयत्न करतात.” 

वयाच्या तेविसाव्या वर्षी पती निधनाला सामोरे जावे लागले.  एकोणतीसाव्या वर्षी “ द हायकास्ट हिंदू वुमन ” पुस्तकातून हिंदू विधवांच्या दुर्देशेवर लक्ष केंद्रित केले. विधवांच्या अवस्थेला “ स्त्रियांसाठी सर्वात वाईट व सर्वात भयानक काळ” संबोधले. ब्राम्हणी प्रथांवर त्यांनी आगपाखड केली. विधवां पुनर्विवाह करण्यास मनाई, विधवांना शापित समजले जाणे, डोके मुंडण करणे, खरखरीत कपडे घालणे, अल्प अन्नावर उदरनिर्वाह करणे, विधवांवर शारीरिक व लैंगिक अत्याचार होतात, अशा विधवांच्या विविध प्रश्नांना वाचा रमाबाईंनी फोडली. पंडीता रमाबाईचा स्त्रीवाद उल्लेखनीय होता. रमाबाईंनी हिंदू धर्मावर टीका करण्याची, बोलण्याची, जाती व्यवस्थेला समजून घेण्याची व विचार प्रकट करण्याची हिम्मत दाखवली. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे पंडीता रमाबाईंना ब्राम्हणांनी उपेक्षित केले व मुख्य प्रवाहातील इतिहासातून त्यांना वगळले. 

4) रमाबाई रानडे - 

बालविवाहाची प्रथा प्रचलित असताना वयाच्या अकराव्या वर्षी महादेव गोविंद रानडे यांच्याशी रमाबाईचा विवाह झाला. विधुर असणारे रानडे व रमाबाई मध्ये तब्बल वीस वर्षांचा फरक होता. ब्राम्हण नवऱ्याने, ब्राम्हण असूनदेखील त्यांना शिकण्यासाठी प्रेरित केले. कुटुंबातील इतर लोकांकडून टीका होऊन देखील रमाबाईंनी स्वतःला शिक्षित केले. शिक्षण पूर्ण करत असतानाचा सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेऊन शोषणाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. मुलींना पूर्व प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी चळवळ उभारली. बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी आंदोलन केले. महिलांच्या राजकिय सुधारणेची व समान प्रतिनिधित्वाचा पाया त्यांनी घातला. पतीच्या मृत्यूनंतर जवळपास एक वर्ष घरी राहिल्याने पुन्हा सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले. सेवासदन स्थापन करून, हजारो महिलांना त्यात नर्सिंगचे प्रशिक्षण दिले. समाजातील शोषित वंचित महिलांच्या समस्येकडे विशेष लक्ष दिले. रमाबाईंनी बालविवाह प्रथा बंद करण्याचे काम देखील केले. पुढे लेखिका झालेल्या, रमाबाईंनी “ माझ्या आयुष्यातील काही आठवणी” पुस्तक लिहिले. आयुष्यभर समाजसुधारक म्हणून काम केलेल्या रमाबाईंनी ब्राम्हणी वर्चस्वाला न झुगारता इतर महिलांना देखील आपल्या कार्यात कोणताही जातीभेद न करता वाहून घेतले. ब्राम्हणी कुटुंबात वाढून, कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता आपले कार्य करत राहणार्‍या रमाबाई रानडे आदर्श वाटतात. 

ब्राम्हण बुद्धिवादी होते, पण सगळ्याच बुद्धिवादी ब्राह्मणांना बुद्धी होती असे म्हणता येणार नाही. बुद्धिवादी असणार्‍या ब्राम्हणांनी स्त्रियांना शूद्र न समजता, मनुवादी विचारांचा पाश त्यांच्या गळ्याला न गुंडाळता त्यांना मुख्य प्रवाहात सामील केले. काही खराब ब्राम्हणांनी स्त्रियांना उपभोगासाठी वापरले, तर काहींनी समाजसुधारणा करण्यासाठी. हाच फरक आहे, चांगल्या व वाईट ब्राम्हणांमध्ये. आज ज्या तीन टक्क्यांच्या माजावर ब्राम्हण गर्व करतो , तो माज झटकून चांगल्या ब्राह्मणांसारखे वागा. बायोमध्ये मनुवादी ब्राह्मण , कट्टर हिंदुत्ववादी लिहून आपल्याच समाजातील स्त्रीची अब्रू वाया घालू नका… ✍️

संदर्भ - महाराष्ट्राचा इतिहास 

                    ━━━━✧❂✧━━━━



Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली