हुंडा आणि पुरुषी मानसिकता...
NCRB च्या डेटा नुसार 2022 मध्ये 6450 हुंडाबळींची नोंद झाली. म्हणजेच दर दिवशी 17 नवविवाहित मुलींची हत्या झाली. ही तर नोंद झालेली आकडेवारी आहे. ज्या केसेस नोंदविण्यात आल्या नाहीत त्याची संख्या तर याच्या दहापट असेल. मुलींच्या मागण्यांवर प्रश्न चिन्ह निर्माण करणाऱ्या मुलांना प्रश्न आहे. हुंडाबळी म्हणून मुलांचा बळी कधी गेला आहे का? मुलगी हुंडा देत नाही म्हणून स्वतःला कधी विहिरीत ढकलून दिले का? गळफास घेऊन आत्महत्या केली आहे का? हुंडा तिनेच द्यायचा, वरून मागण्या देखील करायच्या नाहीत. अरे, लग्न करतात की एकमेकांवर उपकार करताय? मुलींनी मागण्या केल्या तरी अडचण, हुंडा दिला तरी तिचा बळी, नाही दिला तरी तिचाच बळी. करायचे काय त्या मुलींनी? आम्ही हुंडा घेत नाही म्हणणारे मुले देखील, सोने मागतात, कार मागतात, फ्रीझ, सोफा, पलंग अरे बापरे अजून काय-काय ? तुमच्या घरी काहीच नसते का? प्रतीकात्मक पद्धतीने का होईना आम्ही असा हुंडा घेणार आणि गावभर सांगत हिंडायचे, आम्ही हुंडा घेतलाच नाही. हे दोगलेपण काय कामाचे? पहिली गोष्ट तुम्हाला मुलगी नको असते आणि मुलगी हवी आहे तर बिनपगारी 24 तास राबणारी नोकर हवी असते. काही...