शिवाजी महाराज एक रहस्यमय मृत्यू...
शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला याबाबत मोठा संभ्रम आहे. कारण शिवाजी महाराज ज्या वयात गेले, त्या वयात जाणे खरंतर अशक्य आहे. कारण, वय वर्षे फक्त 50 होते. शिवाजी महाराजांचा मृत्यू, हा नैसर्गिकरीत्या झाला आहे की, त्यांचा खून झाला आहे, याबाबतीत इतिहासकार साशंक आहेत. शिवाजी महाराज, हे शरीराने धाडधिप्पाड होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू इतक्या कमी वयात होणे शक्य वाटत नाही. आजही शिवाजी महाराजांचा मृत्यू महाराष्ट्रासाठी गूढ आहे. आणि त्यातील रहस्यही कायम आहे.
शिवाजी महाराजांचा मृत्यू हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे. त्यांचा मृत्यू, कसा झाला? कोण्या अवस्थेत झाला? त्यांचा खून झाला? की त्यांना कोणी फसवून मारले? कोणी विषबाधा केली? असे, असंख्य प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळाली नाही आहे. आणि जी माहिती शिवाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल उपलब्ध, आहे ती ज्याची त्यांनी, त्यांचा मृत्यू कसा झाला हे पटून देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसते. बर्याच, इतिहासकारांचे असे म्हणणे आहे, शिवाजी महाराजांचा मृत्यू हा नैसर्गिकरीत्या झाला. कुणी म्हणते त्यांच्यावर विषप्रयोग केला. कुणी म्हणते, त्यांना कट करुन मारले. खरतर, शिवाजी महाराजांचे कर्तृत्वाची गौरवगाथा स्पष्ट असताना, मृत्यूला कसे डावलले हा मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो. शिवाजी महाराजांच्या, संपूर्ण इतिहासाबद्दल जशी साशंकता आहे, आणि त्या साशंकतेवर शिवाजी महाराजांच्या मृत्यूमुळे आणखीन त्यांचा इतिहास गूढ होत जातो.
शिवाजी महाराज, यांचा इतिहास जसा आहे तसा कधीच समोर आणला नाही, त्याचप्रमाणे त्यांचा मृत्यू कसा झाला याचेही सत्य कदाचित समोर येवू द्यायचे नसेल, असा उद्देश असू शकतो. त्यामुळेच, इतिहास संशोधक इतिहास दडपण्याचा प्रयत्न करू शकतात, असे म्हणायला काही हरकत नाही. शिवाजी महाराजांचा मृत्यू, ज्यावेळेस झाला त्यावेळेस इंग्रजांचा जम जेमतेम बसायला लागला होता. तरीही शिवाजी महाराजांच्या, मृत्यूबद्दल इतके कसे गूढ अजूनही कायम कसे टिकून आहे?
शिवाजी महाराजांना आपले मानणारे शिवाजी महाराजांचा खून झाला, या मतावर ते लोक ठाम आहेत आणि, शिवाजी महाराजांचा द्वेष करणारे, शिवाजी महाराजांचा मृत्यू हा नैसर्गिकरीत्या झाला अशा मतावर ठाम आहेत. परंतु, इथे प्रश्न हा उपस्थित होतो की, त्यांचा द्वेष करणार्यांवर आपण विश्वास, ठेवुन इतिहास आतापर्यंत शिकत आलो आहोत. आणि, कधी-कधी खोट इतके रेटून सांगितल्या जाते, की आपल्याला तेच सत्य वाटायला लागते. शिवाजी महाराजांच्या, मृत्यूबद्दल कदाचित असेच झाले असावे.
शिवाजी महाराजांचा मृत्यू, 3 एप्रिल 1680 रोजी झाला. त्यांच्या मृत्यूवर खरतर चर्चा करणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांचा मृत्यू होण्याच्या, चार वर्षे आधीच, मृत्यूची अफवा स्वराज्यात पसरायला लागली होती. म्हणजेच, जानेवारी 1676 पासून. याबद्दल, इंग्रजांची पत्रे चाळली तर, आपल्याला दिसून येते. शिवाजी महाराजांचा मृत्यू हा खूप मोठा विषय आहे. आणि, त्याहून मोठे, म्हणजे त्याबद्दलचे आपल्या मनात असलेले प्रश्न.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल अफवा, ह्या जानेवारी 1676 पासून पसरायला लागल्या होत्या, ह्याचे संदर्भ ब्रिटिश नोंदी मध्ये आढळते. त्यांच्या पत्रव्यवहारातील, पहिली नोंद ही, 17 जानेवारी 1676 मधील. त्यात असे लिहून आहे की, " it was reported he was poisoned by his son, his son being informed his father had commanded the watch of rairee castle to throw him down over all. असा, उल्लेख झालेला दिसतो. म्हणजेच, शिवाजी महाराजांच्या मुलाने त्यांना ठार केले. त्यांना, रायरीचा, किल्ला पाहायला जा असे सांगून, त्यांना कडेवरून ढकलता येईल. असा काहीसा उल्लेख, आढळतो. त्याचसोबत, स्वॅली मरिनच्या, 1676 च्या जानेवारीच्या पत्रात, शेवटी असा उल्लेख आहे, " here is a flying report that sevajee is dead."
27 जानेवारी, 1676 च्या पत्रात, मध्ये सुद्धा असे नमूद आहे की, मिळालेले अहवाल हे वेगवेगळे आहेत, त्या अहवालात, कधी महाराज पूर्ण बरे झालेले आहेत, कधी मृत्यू झाला असे आहे, तर काही आजारपणात आहेत.
परत, 13 मार्च 1676 च्या पत्रात, असे आहे की " sevagee rajah is very well at purnollah." हे, ब्रिटिशांनी शिवाजी महाराजांच्या स्वाऱ्या आणि आक्रमणे यावरून जाणले होते. त्याचबरोबर, 7 एप्रिल 1676 च्या पत्रात, तर असा उल्लेख आहे की, " he was poisoned by his barbar and for a long time hath not appeared abroad. " म्हणजेच, याचा, अर्थ असा होतो की, शिवाजी महाराजांना त्यांच्या न्हाव्याने विषबाधा केली. त्यानंतरच्या काळात, महाराज काही काळ बाहेर दिसले नाहीत. असे, ब्रिटिशांच्या अनेक पत्रात संभ्रम निर्माण करणारेच काहीना काहीतरी आढळले.
17 व्या शतकात, आजारांचे निदान करण्यासाठी पुरेशी औषधी उपलब्ध नव्हती. औषधी उपलब्ध होती, ती जंगलातील होती. जंगलातील औषधी वनस्पती वापरुन, काढा तयार, करायचे. ही सगळी औषधी वापरली, तरी शिवाजी महाराजांचा आजार बरा होत नव्हता, त्यावेळेस महाराजांनी ब्रिटिशांकडे औषधींची मागणी केली होती. त्या औषधां मध्ये मुख्य मागणी, कार्डियल स्टोन. कार्डियल स्टोन हे असे औषध होते त्या काळी, त्याला सर्वात जास्त मागणी होती. उपचारासाठी ते प्रसिद्ध होते. याचा उपयोग ताप, प्लेग रोग , हृदय विकार आदी उपचारांसाठी होत. शिवाजी महाराजांनी, ही औषधीं मागवली होती, त्याची यादी 14 मे 1677 रोजीच्या पत्रात आढळते.
दुसर्या बाजूला असे दिसून येते की, ज्या दिवशी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, सुरक्षिततेच्या कारणावरून ही बातमी गडाच्या बाहेर पडू दिली नाही. मुसलमान मुलूखात, जालन्याचे जान मोहोम्मद' बाबाच्या शापची अफवा पसरली होती. त्याचसोबत, स्वराज्यात सुद्धा दबक्या आवाजात महाराणी सोयराबाई आणि मंत्र्यांच्या घातपाताच्या चर्चा घडू लागल्या होत्या.
या प्रकरणात सोयराबाई यांचे नाव समोर येऊ लागले होते. परंतु, त्यांच्यावर झालेल्या आरोपाचे खंडन खुद्द छत्रपती संभाजी महाराजांनी केली आहे. बाकरेशस्त्रींना दिलेल्या दानपत्रात त्यांनी असे म्हंटलं आहे, "मातोश्री तो स्फटिकांहून निर्मळ होत्या". परंतु, तरीही बखरकारांनी त्यांना शत्रू ठरवले होते. त्यांनीच शिवाजी महाराजांचा घातपात केला असे चित्र ब्राम्हणांनी रंगविले. आणि, इतिहासकारांनी सुद्धा, सोयराबाईंवर अन्याय केलेला दिसतो.
आणखी एक बाजू अशी समोर आहे की, शिवाजी महाराजांनी ब्राम्हणी दादागिरी संपवून, त्यांनी आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण केले होते. त्यामुळे त्यांच्याच स्वराज्यात असणारे ब्राह्मण मंडळी हळूहळू त्यांच्याच विरोधात जाऊ लागलीत. त्यांच्या कुटुंबात त्यांनी अनेकदा भांडणे लावण्याचा प्रयत्न केला. अपयश आले तरी, मोरोपंत, अण्णाजी, राहूजी सोमनाथ थांबले नव्हते, त्यामुळे त्यांनी महाराजांना संपविण्याचा निर्धार केला होता. अण्णाजी दत्तो, शिवाजी महाराजांच्या विश्वासूपैकी एक होते, परंतु नंतर ते धोकेबाज झालेत. आण्णाजी दत्तो रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला थांबला होता आणि गडावर राहूजी सोमनाथ हा ब्राम्हणी अधिकारी होता. रायगडाची संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली होती. कुणालाही सुगावा, लागणार नाही याची या तिघांनीही काळजी घेतली. या कटाचा कुणालाही सुगावा लागु नये, म्हणून अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत हे घटनां स्थळा पासून दूर थांबले होते. कट रचणारे कधीही घटनां स्थळी थांबत नसतात हे ही तितकेच सत्य आहे. या प्रसंगी, शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे असणारे कुणीही गडावर नव्हते. संभाजी महाराज पन्हाळ गडावर होते. सेनापती हंबीरराव माहिते हे तळबीड या ठिकाणी होते. ते राजगड पासून २५० किलोमीटर आहे आणि शिवाजी महाराज यांचे कुटुंबातील सर्व नातेवाईक हे पाचाडला होते. असा स्पष्ट उल्लेख शिवभारतमध्ये आहे.
3 एप्रिलच्या दिवशी शिवाजी महाराजांच्या भोवती फक्त ब्राह्मणाचे वलय होते. राहुजी सोमनाथने गडावरचे सर्व दरवाजे बंद केले होते. गडावरील सर्व सूत्रे ही, सोमनाथ यांचेकडे होती. अशा, या प्रसंगी शिवाजी महाराजांवर विषप्रयोग करण्यात आला. संभाजी महाराज आणि सरसेनापती हंबीराव मोहिते यांना शिवाजी महाराजांच्या मृत्यूची माहिती होणार नाही, याची त्यांनी खबर घेतली. आणि, शिवाजी महाराज यांचा अंत्यविधी घाई घाईने उरकला. आणि, लागलीच दहा वर्षाच्या राजारामला, त्यांनी सिंहासनावर विराजमान केले. त्याचसोबत, त्यांचा राज्याभिषेक लगेच आटपून घेतला कुणाला कानोकानी खबर लागु न देता. त्यानंतर ब्राह्मण मंत्र्यानी संभाजी महाराजांना अटक करण्याचे फर्मान काढले. आणि, ते पत्रक हंबीराव मोहिते यांचेकडे दिले होते. परंतु, शिवाजी महाराजांनी खासगीत पहिलेच त्यांना सांगितले होते की, छत्रपती संभाजीला करा. आणि दहा वर्षाच्या राजारामच्या हातात कारभार देणे, योग्य होणार नाही कारण, त्याच्या हातात राज्यकारभार देणे म्हणजे, ब्राम्हणांचा हाती राज्यकारभार दिल्यासारखे होईल. इथे असे, दिसून येते की, शिवाजी महाराज यांनी ही सूचना आधीच, हंबीराव मोहिते म्हणजे राजारामचे सख्खे मामा यांना केली होती. म्हणून, हंबीराव मोहिते यांना ब्राह्मण मंत्र्याचे पत्र मिळताच त्यांनी लगेच संभाजी महाराज यांना कळविले. या प्रसंगातून असे, दिसून येते की, सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हंबीराव मोहिते आपल्या सख्ख्या भाच्याला डावलून, संभाजी राजांना छत्रपती, करणार होते. कारण, त्यांना याच्यातच त्यांना स्वराज्याचे हित वाटत होते. यावरुन असे दिसून येते की, सोयराबाई ह्या संभाजी महाराजांना विरोध करणार्या नव्हत्या. हा, या गोष्टीचा पुरावा वाटतो. पण तरीही, ब्राम्हणांनी अशी आरोळी ठोकली, की शिवाजी महाराजांना सोयराबाईने मारले.
वरील सर्व बाबींचा विचार केला तर, आपण कोणत्याही एका निष्कर्षावर पोहोचू शकत नाही. कारण, आपल्याला शिवाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल पक्के असे काही माहिती नाही आहे. जे माहिती आहे ते ज्यानी त्यानी त्याच्या पद्धतीने मांडले आहे. त्यामुळे विश्वास नेमका कशावर ठेवावा हा मोठा प्रश्न इथे निर्माण होतो. शिवाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला? या प्रश्नाचे अजूनही उत्तर अनुत्तरीत आहे. आणि उत्तर उत्तर असेल तरीही, त्याची सत्यता कोण पडताळनार? शिवाजी महाराज, यांचा मृत्यू, महाराष्ट्रासाठी अनुत्तरीत नव्हता रहायला पाहिजे. शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर, काही काळानंतर 1818 साली ब्रिटिशांनी रायगड जाळला आणि त्यातच महत्वाचे दस्तावेज आणि असणारे रहस्य जळून खाक झाले. त्यामुळे, शिवाजी महाराजांच्या मृत्यूची सत्यता काय आहे? हे, आपल्याला कधी ठोस कळेल काही माहिती नाही. आणि, कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवावा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. आपण, शिवाजी कसा समजून घेतला? त्याच्यावर, याचे उत्तर अवलंबून आहे. इतके खरे आहे की, शिवाजी महाराजांचा मृत्यू हे कधी न उलगडणारे येणारे गूढ आहे.
Comments
Post a Comment