समतावादी बुद्ध...
बुद्धाची चिकित्सा करताना इतिहास अभ्यासकांनी बुद्धाच्या मर्यादा मांडताना बुद्धाला विषमतेचा पुरस्कर्ता म्हणून घोषित केले. यामागे कारण, बुद्धाने सुरुवातीला स्त्रियांना संघात घेण्यास नकार दिला होता. बुद्धाने स्त्रियांच्या संघातील सहभागाला विरोध दर्शवित असताना, खालील चार बाबी स्त्रियांच्या बाबतीत उद्गारल्यात.
1) पहिल्यांदा स्त्रीचे मुखदर्शन टाळावे.
2) तोंडासमोर तोंड आले तर जवळ जाऊ नये.
3) जवळ जाण्याचा प्रसंग आलाच तर बोलू नये.
4) बोलणे भागच पडले तर हरणाचे अवधान राखावे.
संघात स्त्रियांचा समावेश केला तर आपला धम्म 500 वर्षे मागे जाईल, ही त्यामागे बुद्धाची काळजी होती. बुद्धाच्या या विचारावर लेनिन म्हणतो की, "समाज परिवर्तक चळवळ परिपक्व झाली आहे, की नाही हे पाहायचे एकच लक्षण आहे. आणि ते म्हणजे समाजपरिवर्तक चळवळीत स्त्रियांचा सहभाग किती आहे? या पार्श्वभूमीवर बुद्धाने स्त्रियांकरिता काय केले? बुद्धाच्या काही मर्यादा होत्या. कारण तो भगवान नव्हता. माणूस होता. बुद्ध हा स्त्री-पुरुष विषमतेचा समर्थक होता. सामाजिक समतेच्या त्याच्या विचारातली ही अत्यंत मोठी त्रुटी होय, असे मला प्रामाणिकपणे वाटते."
लेनीनचे याबाबतीत कौतुकच करावे लागेल, कारण बुद्धाच्या बाबतीत प्रामाणिकपणे आपले मत मांडले. लेनिनच्या या मताचा विचार केला तर आपल्यालाही बुद्ध हा स्त्री-पुरुष विषमतेचा समर्थक वाटतो. परंतु, इथे लक्षात घेतले पाहिजे लेनिन हा मार्क्सच्या विचारधारेवर चालणारा कर्मठ मार्क्सवादी होता. लेनिन हे विसरला की , हाच विषमतावादी दृष्टिकोन मार्क्सला देखील लागु करता येतो. मार्क्सने त्याच्या चळवळीत किती स्त्रियांना सहभागी करून घेतले? परंतु, वादविवाद करतांना असा प्रत्यारोप करणे वादविवादाच्या तत्त्वात बसत नाही. त्यामुळे, लेनिन काय म्हटला यापेक्षा बुद्धाने काय विचार केला हे पाहणे आवश्यक आहे.
बुद्धाने सुरुवातीला संघात स्त्रियांना नको असे म्हटले. परंतु , त्यासाठी बुद्धाचा अनुयायी आनंद ने प्रतिवाद करुन स्त्रियांना संघात घेण्याची अनुमती मिळवली, अर्थातबुद्धाला विषमतेचा पुरस्कर्ता म्हणून घोषित करणारे कर्मठ लोक बुद्धाच्या परिवर्तीत झालेल्या मताला किंमत देत नाहीत आणि एकच री ओढत बसतात. बुद्धाचे मत बदलले पण कर्मठ मार्क्सवादी लोकांचे बुद्धाबद्दल मत बदलले नाही. पोथीनिष्ठ मार्क्सवादी लोक समतेच्या विरोधात असतात म्हणून ही अनुमती बुद्धाकडुनच मिळाली होती. बुद्धाचा हा विचार स्वतः मधील परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले पाऊल होते. बुद्धाला आनंदाने समजून सांगून बुद्धाचे मत बदलले आणि स्त्रियांच्या संघातील स्थानाला महत्व दिले.
मार्क्सवादी लोक बुद्धाचा या अंगाने विचार न करता बुद्धाला देखील आरोपाच्या कचाट्यात उभे करतात आणि मत ठोकून देतात. बुद्धाला विषमतेचा पुरस्कर्ता घोषित करणारे मार्क्सवादी लोक हे लक्षात घेत नाहीत की त्रिपीटक मूळ जसे आहे तसे राहिले नाही. बुद्धाच्या नंतर बुद्धाच्या तोंडी हे शब्द घातले गेले. कारण, अलार कलाम सुत्त सांगणारा बुद्ध , Individuality ला Upmost Importance देणारा बुद्ध हे बोलु शकतो का? बुद्धाला विषमतेचा पुरस्कर्ता म्हणून घोषित करणारे कर्मठ लोक बुद्धाच्या परिवर्तीत झालेल्या मताला किंमत देत नाहीत आणि एकच री ओढत बसतात. बुद्धाचे मत बदलले पण कर्मठ मार्क्सवादी लोकांचे बुद्धाबद्दल मत बदलले नाही. पोथीनिष्ठ मार्क्सवादी लोक समतेच्या विरोधात असतात म्हणून विषमतेचा गवगवा करतात. बुद्धाला विषमतावादी म्हटले तरी , बुद्धाने स्त्रियांना संघात सहभागी करून समतेचा पुरस्कार केला आणि गौतमी पहिली स्त्री संघात सहभागी झाली.
तत्कालीन भारतीय सामाजिक संरचनेचा विचार करता बुद्धाने स्त्रियांना संघात प्रवेशाची अनुमती देणं क्रांतीकारी पाऊल होते. त्यामुळे, बुद्धाला विषमतावादी ठरवण्याचा अट्टहास करणारे, बुद्धाने समतावादी दृष्टिकोन ठेवून उचलले पाऊल लक्षात घेतली पाहिजेत. बुद्ध लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे ना की विषमतेचा. स्वतःच्या मताबरोबर समाजाचे मन वळविण्याचे समाजमन परिवर्तन करणे हा त्याचा मार्ग. बुद्धाचा स्त्रियांच्या बाबतीत समतावादी विचार माणसाला समाजमन परावर्तित सामाजिक संदेश देणारा आहे...!
Comments
Post a Comment