क्रांतिकारी महात्मा फुले...
भाई माधवराव बागल म्हणतात की, "कार्ल मार्क्सच्या अगोदर समतेची दृष्टी महात्मा फुले यांनी महाराष्ट्राला दिली."
भारतात काय जगातही मार्क्सवादी संघटना उदयास आल्या नव्हत्या, तेंव्हाच महात्मा फुले स्त्री दास्य विरुद्ध आंदोलन, शेतकरी समस्या, अस्पृश्यांचे प्रश्न, शोषितांचे प्रश्न शिक्षणाच्या चळवळीतून आधीच सोडवून बसले होते. आजच्या शतकात आम्ही शोषितांचा लढा लढतो असा दावा करणार्या मार्क्सवादी लोकांचे हात थरथरतील अशा प्रश्नांना भिडण्याची हिम्मत 1848 मध्येच फुलेंनी केली होती.
महात्मा फुले आणि बाबासाहेबांचा जन्म होईपर्यंत एकाही मार्क्सवादी लोकांना कामगारांचे आणि मजुरांचे प्रश्न महत्वाचे वाटले नाहीत. फुले दाम्पत्यांनी स्व-खर्चातून मुलींच्या शाळा चालवल्या, विधवां स्त्रियांचे प्रश्न मांडले, शेती कामगारांचे प्रश्न सोडवले, इतकेच काय पुण्यात प्लेगची साथ आली तेंव्हा मार्क्सवादी लोकांचे आदर्श टिळक पुणे सोडून फरार झाले आणि सावित्रीमाईंनी प्लेग रुग्णांची आपल्या अंगा खांद्यावर घेऊन अविरतपणे सेवा केली.
शिवाजी महाराजांची जयंती टिळकांनी सुरू केली म्हणून त्यांचा उदो-उदो करणारे ब्राम्हण आणि मराठा फुलेंच्या कार्याकडे मात्र मुद्दाम दुर्लक्ष करतात आणि टिळकांना डोक्यावर घेऊन नाचतात. शिवाजी महाराजांना मानणार्या लोकांना फुलेंनी काय काय केले हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र, शाहू महाराजांच्या सारखेच फुलेंना देखील न्याय देण्याचे काम इथले ब्राम्हण आणि मराठा करत नाहीत हे दुर्देव आहे.
महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली परंतु, इथल्या स्त्रिया ब्राम्हणी वर्चस्वाच्या गुलाम झाल्यामुळे फुलेंना साधे नमन देखील करत नाहीत. सर्वच मागासलेल्या स्त्रियांना ज्यात ब्राम्हण स्त्रिया देखील येतात, कारण शिक्षणांचा अधिकार नसलेल्या सर्वच स्त्रिया मागासलेल्या होत्या, अशाही स्त्रियांसाठी न्याय, समता आणि स्वातंत्र देण्यासाठी सत्यशोधकी स्त्री-विचार मांडला. विषमतेला नाकारणारा सत्यशोधकी स्त्रीवाद फुलेंची देण आहे.
महात्मा फुलेंनी विद्रोहाच्या नावावर फक्त लोकांना शिव्या घातल्या नाही. विद्रोह हा शिव्यात नसून शोषितांच्या मुक्ती लढ्याच्या प्रत्यक्ष कृतीत असते हे त्यांनी दाखवून दिले. मार्क्सवादी, पुरोगामी लोक जात-पात मानत नसल्याचे आव आणतात आणि लग्नाच्या वेळेस मात्र जाती-पातीला चिटकून बसतात आणि आम्ही Decaste झालो म्हणतात.
महात्मा फुलेंना मानणारे देखील त्यांची विद्रोही कृती कधीच लक्षात घेत नाहीत आणि समाज परिवर्तनाच्या दिशेने पाऊल देखील टाकत नाहीत. महात्मा फुलेंचे, विद्रोही आणि बंडखोर विचार ब्राह्मणांना तर पचतच नाहीत पण स्वतःला आधुनिक समजणार्या लोकांना देखील पचत नाहीत.
महात्मा फुले भलेही भारतीय नेते झाले नाही. परंतु, बाबासाहेबांनी त्यांना आपले गुरू मानून जगात यथोचित सन्मान दिला आणि आपल्या गुरूचे कार्य पुढे नेले.फुलेंचे Radical विचारच आजच्या राजकिय, सामाजिक, आर्थिक, शेतकरी, शूद्र, अति शूद्र स्त्रिया, धर्मांध, अंधश्रद्धा, देवभोळेपणा यावर निराकरण करण्यासाठी आहेत आणि गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म महात्मा फुलेंचे साहित्य आपल्यासाठी School of Thought आहेत.
थोडक्यात, महात्मा फुलेंचा इतका मोठा School Of Thought असताना मार्क्स, माओ, लेनिन यांच्या पुराण साम्यवादापेक्षा आणि ब्राम्हणी पुरोगामी लोकांपेक्षा फुलेंची आधुनिक समता आजही पूरक ठरते फक्त आपल्याला त्यांच्या चळवळीला व्यापक स्वरुप प्राप्त करून देणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment