जात टिकवणारे शिक्षित...!

शिक्षण केवळ ज्ञान देते असे नाही , ते कोणत्या मूल्यांच्या चौकटीत तुम्हाला दिले जाते , हे ठरवते की माणूस माणूस बनतो की भेदभावाचे साधन. शिक्षण जर जात नष्ट करण्याचे साधन नसेल , तर ते जात टिकवण्याचे शस्त्र ठरते. हेच आपण आज शिक्षित सवर्ण पुरुष , बायका आणि मुलींना पाहताना अनुभवतो. ब्राह्मण , सवर्ण आणि इतर उच्च जातीतले लोक शिकतात आणि जातिव्यवस्थेच्या संरक्षणासाठी झटतात.

शिक्षणानंतर ते ‘Merit’, ‘Quality’, ‘Hard Work ’ अशा शब्दांचा शाब्दिक असा पाढा वाचतात की जणू त्यांनी आयुष्यात काहीच विशेषाधिकार उपभोगलेले नाहीत. आरक्षणावर टिका करताना त्यांची भाषा घशात बसलेला माईकसारखी मोठी असते , पण स्वतःच्या जातीतून मिळालेल्या ओळखी , कौटुंबिक भांडवल , आणि संबंधांनी मिळालेल्या संधीवर कधीच चकार शब्दही काढत नाहीत आणि सवर्ण बायका? त्यांचा फेमिनिझमही जातिअंध आहे. तो मूळ समस्यांवर कधीच बोट ठेवत नाही. त्यांना जातीच्या अधिष्ठानावर आधारित असलेल्या पितृसत्तेचे भानच नाही. त्यांच्या चर्चेचा गाभा ‘दारू , बीडी , सिग्रेट , शरीरस्वातंत्र्य’ इथवरच मर्यादित असतो. बुद्ध , फुले , बाबासाहेब , सावित्रीबाई या त्यांच्या स्त्रीवादी नकाशावर कुठेच नसतात. ते परदेशी बाईचे 'द सेकंड सेक्स' पुस्तक वाचून त्यांचा Feminism जागा होतो. कारण त्यांचे बरेच ‘Problems ’ Solve झालेले असतात - वर्ग , जात , आणि सत्तेची साथ मिळाल्यावर बाकीचे काही ‘Luxury Debate ’ वाटते त्यांना. म्हणूनच मग इतरांची बौद्धिक लढाई त्यांच्यासाठी 'Overreaction' वाटते आणि तरीही हे सगळे लोक स्वतःला ‘Liberal ’, ‘Progressive ’, आणि ‘Woke ’ म्हणवतात. पण प्रत्यक्षात हे सगळे जात टिकवणारे मुख्य एजंट आहेत फक्त इंग्रजीत बोलतात , त्यामुळे लोक गोंधळतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा सांगितले की , “An educated man from the higher caste is more interested in maintaining the caste system after education than before it.” तेव्हा ते आजचे चित्र सांगत होते , याची खात्री पटते.

Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली