शोषितांच्या संघर्षाची खिल्ली

न्यूझीलँडची खासदार हाना-राव्हिटी माईपी-क्लार्क पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण, तिने संसदेत माओरी (आदिवासी) विरोधी विधेयकाचा निषेध केला. विषय महत्वपूर्ण असला की, ती चर्चेत येते आणि आपल्याकडे लोक त्याला Meme मटेरियल म्हणून खिल्ली उडवतात. ज्या पद्धतीने कमी वयात तिने जे स्थान मिळवले आणि आदिवासी लोकांचे हित साधण्यासाठी जी महत्वाची भूमिका घेतली, त्यावर मात्र कोणीही बोलत नाही. फक्त Meme Material म्हणून शेअर करत सुटले. तिची ओळख आदिवासी नसती किंवा ती इतर कुठल्याही जातीची असती, तर तिचे काम समाजाने गौरवान्वित केले असते. ती भारतीय वंशाची असती, तरी तिला अशा प्रकारे पाहिले नसते. याच मानसिकतेतील फरक स्पष्टपणे दिसून येतो. आपल्याकडे लोकांना कोणत्या विषयाकडे कसे बघायचे याचे गांभीर्य अजूनही आलेले नाही. अमेरिकेच्या निवडणुकीत ब्राम्हण कमला हॅरिस जिंकली असती, तर तिचा सन्मान केला गेला असता, परंतु, ती हरल्यावर देखील तिच्यावर इतके Meme बनवताना दिसले नाही. यामधून एक गोष्ट स्पष्ट होते, वरच्या जातीतील लोक, कोणत्याही देशात असोो, त्यांनी काहीही केले तरी त्याचे Glorification केले जाते. खालच्या जातीतील लोकांनी जगभरात महत्त्वाचे काम केले तरी ते विनोदाचे किंवा हास्यास्पद विषय बनवले जातात. भारतातील जातीवादी मानसिकतेचे लोक खालच्या जातीतील लोकांनी काही मोठे योगदान दिले की त्यांचा अपमान करतात, त्यांना हसतात आणि त्यांनी केल्या नसलेल्या चुका शोधण्याचा प्रयत्न करायचा. त्यांच्या कामगिरीचे गांभीर्य कधीही समजून न घेता, त्यांच्याकडे केवळ हिणवण्याच्या दृष्टिकोनातून पाहतात. वरच्या जातीतील व्यक्तींना नेहमीच विशेषाधिकार दिला जातो. त्यांनी कोणतेही साधे काम केले तरी त्यांचे कौतुक केले जाते आणि मात्र खालच्या जातीतील लोकांनी मोठे काम केले तरी त्यांची टर उडवली जाते. एकही जण बोलले नाही, अशा पद्धतीचा आदिवासी आवाज आपल्या भारतीय संसदेत गाजला पाहिजे म्हणून. शोषित, आदिवासी, वंचित लोकांचे स्वतंत्र आवाज उभे राहिले पाहिजे म्हणून. उलट Meme Material बनून त्यांच्या संघर्षाची खिल्ली उडवली जात आहे. लोकांच्या मानसिकतेत बदल होणे आवश्यक आहे. उगाच कशालाही Meme Material म्हणून प्रस्तुत करणे चुकीचे आहे. कारण, असे करणे म्हणजे शोषितांना Meme म्हणून प्रस्तुत करणे. Meme बनवणे, खिल्ली उडवणे हे सोपे आहे, परंतु, त्यातून समाजातील विषमता आणि पूर्वग्रहांची मुळे आणखीनच मजबूत होत राहतात, हे लक्षात घेतले पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार