शिर्डीपासून अक्कलकोटपर्यंत : बाबावादाचे ब्राह्मणी षड्यंत्र

ज्या लोकांना जन्मतारखा नसतात त्यांचे प्रकटदिन साजऱ्या केल्या जातात. शिर्डीचे साईबाबा , शेगावचे गजाजन बाबा आणि नव्यानेच ज्यांचे प्रस्थ वाढत चालले आहे ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ. ह्या तिन्ही बाबांचे महाराष्ट्रात प्रकटदिन साजरे केले जातात. कारण , ब्रिटीशांच्या कार्यकाळात हे बाबा होऊन गेले असा दावा केल्या जातो , तरी त्यांच्या जन्मतारखेच्या कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंटेशन झालेले नाही. प्रश्न हा आहे की , मग हे प्रकट कसे झाले? कोणी केले? कुठून आले? आणि आता बहुजनांच्या माथ्यावर कोणी मारले? ग्रामीण भागात पहिले विठ्ठल एकच देवता होती , तेही देवता नव्हते माणूस होते आणि तेच लोकांना प्रिय होते. पण मागील काही काळामध्ये विठ्ठलाचे महत्व कमी करून ह्या तिन्ही बाबांचे महत्व महाराष्ट्रात वाढलेले आपल्याला दिसेल. विठ्ठलाची उपासना ही महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या सांस्कृतिक ओळखीशी निगडीत आहे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ही ओळख प्रबळ झाली , आणि त्याचे केंद्रबिंदू पंढरपूर राहिले आहे , हा इतिहास आहे. पण ह्या तिन्ही बाबांनी काय केले आहे समाजासाठी? कोणता इतिहास आहे यांचा? ब्रम्हांड नायक म्हणून मिरवणाऱ्या या बाबांचे चमत्कारिक गोष्टी पलीकडे कोणतीही ओळख नाही. माणसे बायका दिवसरात्र यांच्या पोथ्या वाचतात , काय मिळते वेड्यासारखे पोथ्या वाचून? कॉलेज सुटले की न चुकता मुली मठात जातात , बायका रोज संध्याकाळी पाच-पाच दिवे घरी लावतात. कशासाठी? नव्याने प्रस्थापित केल्या जात असलेल्या बाबांच्या पूजेचा पद्धतशीरपणे अजेंडा राबवून अंधश्रद्धा पसरविण्याचे काम सुरू आहे आणि ते इथल्या प्रस्थापित सत्ताधारी वर्गासाठी फायदेशीर आहे. म्हणून बहुजनांच्या माथ्यावर हे तिन्ही बाबा मारले. महाराष्ट्रात 1990-92 नंतर , समाज सुधारणा करणारे कोणीही नसल्यामुळे बाबा संस्कृतीला मोठी चालना मिळाली. त्याचाच परिणाम असा झाला की , शिर्डीच्या साईबाबाचा प्रभाव वाढवण्यात आला , मग शेगावच्या गजानन बाबाला त्याच धर्तीवर पुढे आणले गेले , आणि आता स्वामी समर्थाच्या नावाखाली शहरांपासून खेड्यापर्यंत मठ , मठांच्या शाखा , आश्रम उभारले जात आहेत. साईबाबाची लोकप्रियता हिंदी सिनेमांमधून वाढवली , गजानन बाबाचे देखील तसेच झाले आणि आता स्वामी समर्थ यांची महती मराठी चित्रपट आणि सिरियलच्या माध्यमातून वाढवली जात आहे. यात मराठीतील बिनडोक कलाकार प्रविण तरडे , निवेदिता अशोक सराफ , अमृता खानविलकर यांनी मोठी भूमिका बजावली आहे. काही संशोधकांच्या मते , साईबाबाचा जन्म , मृत्यू आणि पार्श्वभूमी सगळेच संदिग्ध आहे , तर गजानन बाबा आणि स्वामी समर्थ यांच्या कथांमध्ये असंख्य मिथके आढळून आलेली आहेत. काही अभ्यासकांना तर असा संशय आहे की , हे बाबा वेगवेगळ्या ऐतिहासिक ब्राह्मण योद्ध्यांचेच , म्हणजेच दुसरे नानासाहेब पेशवे , माधवराव पेशवे आणि तात्या टोपे नव्या रूपातील बाबा अवतार आहेत , जे पानिपत आणि ब्रिटिशांविरुद्धच्या लढायांमध्ये 'गायब' झाले होते. हे पेशवे- टोपे मृत्यू कसे पावले , यांचे मृतदेह कोणाच्या हाती लागले? हे कोणालाही माहिती नाही आणि मग , त्याचवेळी त्यांनी अचानक विविध ठिकाणी प्रकट होऊन 'बाबा' म्हणून उपास्य देव बनण्यामागे कोणती ताकद कार्यरत होती? ह्या तीनही बाबांचे ऐतिहासिक दृष्ट्या सर्वकाही संशयास्पद आहेत. पानिपतच्या युद्धानंतर गायब झालेल्या ब्राह्मण अधिकारी वर्गानेच हे नवे बाबा म्हणून 'प्रकट' होण्याची संकल्पना रचली. 
त्यामुळे ही बाबांची भक्ती हा केवळ आध्यात्मिकतेचा भाग राहात नाही , तर त्याला एक ब्राह्मणी राजकीय हेतूही जोडलेला आहे. बहुजन लोकांवर संपूर्ण ब्राह्मणी वर्चस्वाचा आधीच जोरदार पगडा आहे , त्यात विठ्ठलाचे राम कृष्ण हरी म्हणून ब्राम्हणीकरण झालेलेच आहे. ब्राम्हणांनी खेळी करून आता हे ढोंगी बाबा बहुजनांच्या माथी मारले , आणि सगळेजण त्यांच्याच श्रद्धेत अडकून बसले. 

Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली