हिंदू चौकटीत अडकलेले पुरोगामी आणि वैज्ञानिक बुद्ध धम्म
थोर वैज्ञानिक अल्बर्ट आइंस्टाईन म्हणतो -
"If there is any religion that would cope with modern scientific needs, it would be Buddhism."
पुरोगाम्यांना चांगले माहिती आहे , की बुद्ध धम्म विज्ञानावर आधारित आहे. बुद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानात ना कोणतेही चमत्कार आहेत , ना अंधश्रद्धा , ना देवपूजा. तर्क , अनुभव , आणि शाश्वत सत्याचा शोध हीच बुद्ध धम्माची मूलभूत तत्त्वे आहेत. परंतु , हिंदू पुरोगाम्यांना स्वतःच्या हिंदू धर्माच्या चिखलातून बाहेर पडता येत नाही. यामुळेच ते चुकीचे तत्त्वज्ञान मांडून हिंदू धर्माच्या कसोट्या बुद्ध धम्मावर लावण्याचा प्रयत्न करतात. "बौद्ध संस्कृती नाही ," "बौद्ध लग्नांमध्ये पांढरे कपडे घालतात ," असे बिनबुडाचे आरोप करत लोकांसमोर हिंदू धर्म , मोडीत काढता येत नाही म्हणून बुद्ध धर्म देखील वाईटच भासवण्याचा प्रयत्न करतात.
हिंदू पुरोगाम्यांचे खरे दुखणे हे आहे , की बुद्ध धम्माच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे तो पारंपरिक धर्माच्या संकल्पनेच्या पलीकडे जातो. हिंदू धर्मातील ब्राह्मणवादी चालीरीती , देवपूजा , कर्मकांडे आणि जातीय व्यवस्था या पुरोगामी संस्कृतीच्या नावाखाली आजही जोपासल्या जातात. त्यामुळे , स्वतःच्या हिंदू धर्मावर प्रश्न विचारण्याऐवजी , ते बुद्ध धम्मावर बिनबुडाच्या टीका करण्यास अधिक तत्पर असतात.
हे स्पष्ट आहे की , हिंदू पुरोगामी केवळ धर्माच्या चिकित्सेचा आव आणतात , पण प्रत्यक्षात चिकित्सेच्या पुढे एकही पाऊल टाकण्याची तयारी ठेवत नाहीत. त्यांना स्वतःचा हिंदू धर्म वैज्ञानिक असल्याचे सिद्ध करायचे असते. परंतु , प्रत्यक्षात तो अंधश्रद्धा , कर्मकांड , आणि जातीय व्यवस्थेने भारलेला असल्यामुळे त्यांना स्वतःच्या भूमिकेचा आधारही उरत नाही. परिणामी , ते केवळ सरसकटपणे काहीही बरळत राहतात.
बुद्ध धम्मावर बिनबुडाच्या आरोपांच्या मुळाशी जाण्याआधी , या देशातील प्रत्येक सुजाण व्यक्तीने स्वतःच्या धर्माच्या रचनेवर त्यातील जात , अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांच्यावर चिकित्सा करणे आवश्यक आहे. बुद्ध धम्म ही केवळ श्रद्धा नाही , तर तत्त्वज्ञान आहे. जे अनुभवावर आधारित आहे , तर्कशुद्ध आहे , आणि विज्ञानाशी सुसंगत आहे. म्हणूनच , बुद्ध धम्म समजून घेण्याऐवजी त्याला हिंदू चौकटीत मोजण्याचा प्रयत्न करणे हे केवळ अज्ञानाचे लक्षण आहे.
विज्ञानावर निस्सीम प्रेम असूनही , आइंस्टाईन यांनी बुद्ध धम्माकडे केवळ एका धर्मासारखे पाहिले नाही , तर एका वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगण्याच्या तत्त्वज्ञानासारखे पाहिले.
विज्ञानाच्या क्षेत्रात मोलाचा ठसा उमटवणारे थोर वैज्ञानिक अल्बर्ट आइंनस्टाइन यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!!! 🙏🏻
बुद्धम् शरणं गच्छामि... 💙
Comments
Post a Comment