हिंदू चौकटीत अडकलेले पुरोगामी आणि वैज्ञानिक बुद्ध धम्म
थोर वैज्ञानिक अल्बर्ट आइंस्टाईन म्हणतो - "If there is any religion that would cope with modern scientific needs, it would be Buddhism." पुरोगाम्यांना चांगले माहिती आहे , की बुद्ध धम्म विज्ञानावर आधारित आहे. बुद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानात ना कोणतेही चमत्कार आहेत , ना अंधश्रद्धा , ना देवपूजा. तर्क , अनुभव , आणि शाश्वत सत्याचा शोध हीच बुद्ध धम्माची मूलभूत तत्त्वे आहेत. परंतु , हिंदू पुरोगाम्यांना स्वतःच्या हिंदू धर्माच्या चिखलातून बाहेर पडता येत नाही. यामुळेच ते चुकीचे तत्त्वज्ञान मांडून हिंदू धर्माच्या कसोट्या बुद्ध धम्मावर लावण्याचा प्रयत्न करतात. "बौद्ध संस्कृती नाही ," "बौद्ध लग्नांमध्ये पांढरे कपडे घालतात ," असे बिनबुडाचे आरोप करत लोकांसमोर हिंदू धर्म , मोडीत काढता येत नाही म्हणून बुद्ध धर्म देखील वाईटच भासवण्याचा प्रयत्न करतात. हिंदू पुरोगाम्यांचे खरे दुखणे हे आहे , की बुद्ध धम्माच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे तो पारंपरिक धर्माच्या संकल्पनेच्या पलीकडे जातो. हिंदू धर्मातील ब्राह्मणवादी चालीरीती , देवपूजा , कर्मकांडे आणि जातीय व्यवस्था या पुरोगामी संस्कृतीच...