मार्क्सवादाची शिस्त, आंबेडकरवाद

कार्ल मार्क्स आजही जगभर वाचला जातो, जगात असे क्वचितच लोक सापडतील जे मार्क्सच्या तत्त्वज्ञानाने भारावून गेले नसतील. कारण मार्क्सचे अनुयायी त्याच्याशी नेहमीच प्रामाणिक राहिले. भारतातील मार्क्‍सवादी लोकांनी इथल्या शोषितांचे प्रश्न कधीही सोडवले नाही, तो भाग वेगळा. कारण, भारतातील मार्क्‍सवादी खोटारडे निपजले आणि सर्वण लोकांच्या हातात मार्क्‍सवाद बंदिस्त झाला. असे असूनही मार्क्‍सवादी विचारधारेला, केवळ त्याचे विचार वाचून थांबले नाहीत, तर त्यातून एक संपूर्ण विचारधारा - एक School Of Thought उभी केली. Marxism हा जगात विचार राजकीय पातळीवर अपयशी ठरला असला, तरी त्याला सिद्ध करणारे, टिकवणारे, प्रसारित करणारे अनुयायी त्याच्याशी कधीही गद्दारी करत नाहीत. कार्ल मार्क्स स्वत: फक्त ग्रंथांत वावरला, Volume वर Volume लिहीत बसला, कधीही रस्त्यावर उतरला नाही, कामगारांच्या चळवळीत देखील कधी कोणत्या महिलेसह आंदोलन केले नाही. पण त्याचे अनुयायी रस्त्यावर उतरले. त्याच्या विचारांनी लोकांनी चळवळी उभ्या केल्यात, सत्ता मिळवली, हरल्या तरी पुन्हा उभ्या राहिल्या. कारण त्याच्या अनुयायांनी मार्क्सला मरू दिले नाही. त्याचे नाव, त्याचे विचार, त्याचे तत्त्वज्ञान हे त्यांनी 'Intellectual integrity' राखून जगभरात पुढे नेले. याउलट मात्र बाबासाहेब? बाबासाहेबांनी केवळ तत्त्वज्ञान मांडले नाही, केवळ Volume लिहीत बसले नाहीत. तर ते प्रत्यक्ष कृतीत उतरवले. रस्त्यावर उतरून शोषितांसाठी लढा दिला, अखंड मानव मुक्तीसाठी संविधान दिले, महिलांसाठी काम केले, शोषितांना धर्मांतर दिले, समतेचा लढा दिला. तरी आज त्यांच्या अनुयायांमध्ये बाबासाहेबांचे नाव घेण्याची लाज वाटतेय. 'आंबेडकरवादी' म्हणवून घ्यायला संकोच वाटतोय. फक्त 'बौद्ध' म्हणून मिरवायचे, आंबेडकरवाद टाळायचा-ही वृत्ती बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक नाही, आणि ती ब्राह्मणवादालाच पोसणारी आहे. शोषक वर्गाने पुरवलेला, सामाजिक संघर्षाचा बुद्ध नाकारून आणि आध्यात्मिक विपश्यनेचा बुद्ध स्वीकारून त्यांच्या अन्यायाला मूक संमती द्यायची. Antonio Gramsci च्या भाषेत बोलायचे झाले तर, कोणत्याही क्रांतीला यशस्वी करण्यासाठी ‘Organic intellectuals’ लागतात. समाजातूनच निर्माण होणारे विचारवंत, जे आपल्या समाजाच्या परिवर्तनासाठी वैचारिक युद्ध लढतात. Marxist school of Thought ने असे विचारवंत तयार केले. मार्क्सच्या तत्त्वज्ञानात त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांनी त्याच्या विचारांचे संकलन केले. वाद-विवाद घडवले, चर्चासत्रे आयोजित केली, त्यातून शिस्तबद्ध वैचारिक परंपरा उभी केली. पण बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये अजूनही अशा Ambedkarite School Of Thought तयार होऊ शकलेला नाही. आम्ही केवळ आमच्या अन्याय अत्याचाराला कादंबरी आणि कवितांमधे बंदिस्त केले. केवळ शोषण झेलून फक्त भावनिक प्रतिक्रिया देणे, ही कोणत्याही प्रकारची 'विचार' साखळी नाही. विचारसंपन्नता, सिद्धांत, आणि संघर्षाची प्रामाणिक जाणीव याचं एकत्रित रूप म्हणजे आंबेडकरवाद आजपर्यंत असायला हवा होता. मात्र आज अनेकांनी आंबेडकरवादी विचारसरणी नाकारायचे ठरवले आहे. Gramsci म्हणतो, शोषक व्यवस्थेला टिकवण्यासाठी ‘Consent’ लागतो आणि जेव्हा शोषित गप्प बसतात, तेव्हा शोषकांना लढावे लागत नाही. आज जे अभिजन बौद्ध आहेत, जे बाबासाहेबांना विसरून, आंबेडकरवाद झटकून पुढे जात आहेत, ते त्या शोषक वर्गाला ‘Consent’ देत आहेत. त्यामुळे ब्राह्मणवाद शाबूत आहे, कारण आपल्याच लोकांनी त्याच्याशी लढण्याचे सोडलेय. बाबासाहेबांची प्रामाणिकता आणि त्यांचे माणूसपण केवळ नावात नसते, ते कृतीत असते. 
मार्क्सवाद जगात फेल झाला तरी मार्क्स रोज वाचतोय, कारण त्याच्या अनुयायांनी गद्दारी केली नाही. बाबासाहेबांचं कार्य कितीही यशस्वी असले, तरी जर त्यांचे अनुयायीच त्यांचे नाव घेणे टाळत असतील, तर आंबेडकरवाद संपवणारे शत्रू नसून आपणच आहोत. बाबासाहेब जिवंत राहतील की नाही, हे त्यांच्या शत्रूंवर नव्हे, आपल्या प्रामाणिकतेवर अवलंबून आहे.

Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली