बौद्ध मुखवट्यातले ब्राह्मण

चला आज नकली मनू बौद्धांचा निकालच लावू...! 

आंबेडकरवादी लोकांवर हुकूमशाहीचा आरोप होतोय. भावडय़ा आधी एक सांग , हुकूमशाही म्हणजे काय ते माहितेय का? की स्वतःचा फक्त ब्राह्मणी अहंकार दुखावल्यामुळे कुठूनतरी शब्द उचलून आणलास आणि आंबेडकरवादी लोकांच्या तोंडावर फेकून मारला ? आंबेडकरवादी लोक हुकूमशहा व्हायला काय , 
आंबेडकरवादी लोकांनी कुणाचे हक्क मारलेत का ? कुणाला गुलाम केलेय का? कुठे धार्मिक दंगे घडवलेत , कुणाच्या घरादारावर हल्ले केलेत का? नरसंहार घडवला का? नाही ना? मग हुकूमशाही कशी आली आणि कुठून आली? आंबेडकरवादी असणे गुन्हा काय आहे? न्याय , समता , बंधुता यासाठी आवाज उठवणे चुकीचे आहे का ? लोकशाही बद्दल वाचलेय का कधी ? समाजात माणूस म्हणून जगण्याची मागणी करणे म्हणजे हुकूमशाही वाटत असेल , तर तुमची बामणी मानसिकता तुम्हाला लखलाभ! तुमच्या डोक्यात आंबेडकरवादी लोक आता हुकूमशहा झाले आहेत , कारण एवढेच आहे , ते तुमच्या वर्चस्वाला आव्हान देतात. बाबासाहेब म्हणाले , शिका , संघटित व्हा , संघर्ष करा आणि ते आंबेडकरवादी लोक करतायत. तर तुम्हाला त्रास काय आहे नेमका? आम्ही चुप बसत नाही म्हणून? हजारो वर्षं हुकूमशाही बामणांनी केली , आणि त्या विरोधात आम्ही बोललो तर ती हुकूमशाही वाटते! याला म्हणतात ब्राह्मणी संस्कार. तुमच्यावर ब्राम्हणी संस्कारांचा पगडा इतका जबरदस्त झाला आहे की , शोषक वर्गाला पूरक अशा भूमिका घेण्यात तुम्ही धन्यता बाळगत आहात! Communist लोकांची कमी नव्हती , आता त्यात तुमची भर पडलीय. Communist निदान बाबासाहेबांचे भक्त म्हणायचे , तुम्ही त्यांच्या दोन पाउल पुढे टाकून हुकुमशाह म्हणायला कमी केले नाही. तुमची पण त्या लोकांसारखी इच्छा आहे का? बाबासाहेबांच्या अनुयायांनी त्यांच्यावरचा विश्वास झटकून बामणी लोकांचे फुट सोल्जर्स बनून जावे , नक्षलवादी बनावे , भ्रष्टाचार करावा? त्यापेक्षा भाबडेपणा परवडला. बाबासाहेबांच्या विश्वासाने लोक एकमेकांना धरून राहतात , अडचणींना एकमेकांना साथ देतात, अन्याय अत्याचार झाला तर बाबासाहेबांच्या आधाराने रस्त्यावर उतरतात.

त्यानंतर तुमचा दुसरा कांगावा – "आंबेडकरवादी लोक Buddhism Follow करत नाहीत." हो का? आम्ही कुठला Buddhism Follow करत नाही माहितीये का तुम्हाला ? तुमच्यासारख्या बामणी , पितृसत्ताक , संघी अजेंड्याचा Buddhism आम्ही Follow करत नाही. तुमचा Buddhism तुम्हाला काय सांगतो ? वादविवादात हरल्यावर कमरे खालच्या शिव्या देणे , महिलांना टार्गेट करणे , बाबासाहेबांच्या अनुयायांना Average आंबेडकरवादी म्हणणे , बुद्धाला विकृत करणे आणि खुद्द बामणी अजेंड्याला Buddhist नावाने फॉलो करणे. तुमचे Buddhism फॉलो करणे म्हणजे गल्लीत दारू पिणे , विहारात जुगार खेळणे आणि सोशल मीडियावर 'आम्हीच खरे बौद्ध आहोत' म्हणून फ्रस्ट्रेशन मोकळे करणे. आम्ही तो Buddhism Follow करत नाही. तुमचे एवढं बुद्ध प्रेम उतू जात असेल आहे , तर महाबोधी विहार बामणांच्या हातात आहे , तिथे तुमचे Buddhism कुठे गेले? तुमच्या लेण्यांवर आक्रमण होत आहे? तिथे तुम्हाला कळवळा फुटला नाही. तिथे बरा तुम्हा लोकांना आंबेडकरवादी लोकांचा आधार घ्यावा लागतो. कारण तिथे बोलण्याची हिम्मत होत नाही. पण आंबेडकरवादी लोकांवर टीका करण्याची एक संधी सोडत नाहीत. काही लोक म्हणतात "आम्ही 1956 पूर्वीपासून बौद्ध आहोत”. फार भारी! शाब्बास! मग बुद्ध जमिनीत गाडला गेला तेव्हा तुमचे पूर्वज काय करत होते? झोपले होते का? की 'बौद्ध' नावाने बामणकी करत होते? 1949 पासून महाबोधी विहाराचा लढा सुरू आहे , तेंव्हा तुम्ही कोणत्या बिळात लपून बसला होतात? इतिहास माहीत असेल तर खरे उत्तर दे भावडय़ा! त्यानंतर एक नवा शोध –"विहारात इतर महापुरुषांचे फोटो खटकतात". कुठल्या विहारात , कधी , कोणते फोटो पाहिलेत ? Data आहे का? की नुसती हवेत बडबड? आणि फोटोने इतके काय वाकडे केले? विहारात फोटो दिसतो , पण तिथे जुगार खेळणारे , दारू पिणारे दिसत नाहीत का? तिथे विरोध केलाय का कधी? की तिथेही गप्प आणि इथेच Online शाब्दिक बाचाबाची ? बाबासाहेबांचे एक वाक्य सोयीनुसार Quote करायचे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्मासाठी सर्वकाही त्याग करायला सांगितले म्हणजे काय? त्याग म्हणजे काय? अन्यायासमोर गप्प बसणे का? आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराला चुपचाप सहन करणे का? लोकांच्या बामणकीवर चुप राहणे का? अभिजन झालेले बौद्ध बांधव , बौद्ध धम्मासाठी सगळे सोडून उच्चभ्रू सवर्ण अभिजनासारखे वागण्याचा सल्ला देतायत. का भावा , तुला वर्चस्ववादी ब्राह्मण बनायचे आहे का? पण मग SC-ST आरक्षणावर हमला होतोय , तुमचा फंड गायब होतोय, त्यावर देखील गप्पच बसायचे का ? मला "Frustrated Hindu LC आहे. " असे संबोधले. वा! स्वतःला बौद्ध म्हणून घेतोस आणि इतरांची जात शोधतोस? बुद्धिस्ट होऊनसुद्धा? आम्हाला बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा. पण बौद्ध धर्माच्याच खऱ्या अनुयायांवर शेरेबाजी करून. म्हणजे तुमचे Buddhism मनुवादी मानसिकतेतले आहे , बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध नाही. वादविवाद करता आला नाही की शिव्या आणि मुलींना घाणेरडे बोलणे , ही तुमची Debating Skill आहे. कोणी त्याला घाबरत नाही. बुद्धांकडून Debating Skill शिकून घ्या जरा!!! निर्बुद्धपणे वागून प्रबुद्ध भारत घडविण्याचे स्वप्न पाहतायत. आले मोठे शहाणे Buddhism शिकवणारे!!!??? 

Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली