Brahmin Genes आणि जातीय नैतिकतेचे डबल स्टँडर्ड
उदित नारायण उच्चभ्रू आणि उच्च जातीतील मैथील ब्राह्मण व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांनी कितीही पोरींना Kiss करत फिरलं , तरी कोणी त्यांना नैतिकतेचे धडे देणार नाही, किंवा त्यांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणार नाही, त्यांना नैतिकतेचे डोस पाजणार नाही. कारण, भारतीय समाजात उच्चजातीयांना मिळणारा तो विशेषाधिकार आहे. हेच जर एखाद्या खालच्या जातीतील ओबीसी, दलित किंवा आदिवासी कलाकाराने केली असते, तर आतापर्यंत त्याला जबरदस्त प्रसारमाध्यम ट्रायलचा सामना करावा लागला असता. त्यांच्यावर सार्वजनिकरित्या हल्ले झाले असते आणि त्याच्या संपूर्ण कारकीर्दीला डाग लागला असता. इथे Twitter, Facebook वर दिवसरात्र दारूचे फोटो टाकणारे सुद्धा विनोद कांबळीला दारूवरून लक्ष करतात, आणि सचिन तेंडुलकर इतका फ्लॉप खेळून देखील त्याच्या फ्लॉप वर कोणी शंका घेत नाही. विनोद कांबळीला केवळ एका गोष्टींवरून धारेवर धरले, त्याच्या चारित्र्यावर हल्ले केले, त्याला सुधारगृहात पाठवण्याची मागणी झाली. आता उदीत नारायणला कोणी शिव्या घालणार नाही, कारण ते त्याचे व्यक्तिगत जीवन आहे आणि त्याला तसे वागण्याचा अधिकार आहे, म्हणून कोणी त्याला नैतिकता सांगणार नाही. हे उच्चभ्रू, ब्राम्हण, मराठा, देशमुख, पाटील, इनामदार मिरासदार सरंजामी लोकांना मिळालेला जातीय विशेषाधिकार आहे. इतिहासात डोकावले तरी, गांधीजींचे उदाहरण घ्या, त्यांचे वडील मरणासन्न अवस्थेत असताना ते मात्र स्वतःच्या वासनेत मग्न होते आणि उतारवयात देखील आपल्या ब्रह्मचर्याची परीक्षा घेण्यासाठी दोन तरुण मुलींबरोबर विवस्त्र झोपायचे प्रयोग केले, ज्याला मराठीत 'सत्याचे प्रयोग' आणि इंग्लिशमध्ये 'My Experiment With Truth' म्हटले जाते आणि म्हणून समाजाने देखील 'महात्मा' ही पदवी दिली. जर हीच कृती एखाद्या खालच्या जातीतील व्यक्तीने केली असती, तर त्याला समाजानं उद्ध्वस्त करून ठार मारून टाकले असते. इथे Twitter, Facebook वर देखील असलेले फेमिनिस्ट म्हणवणाऱ्या काही पोरी, बायका आणि फेमिनिस्ट पुरुष ह्या मुद्द्यावर उदीत नारायणला वाचवताना दिसतायत, त्यांना खरंच फेमिनिस्ट म्हणावे का? काडीचीही अक्कल नसलेले हे लोक उदीत नारायणला निर्दोष आहेत म्हणत सुटलेत. Action ची Reaction दिसली, परंतु मुलींच्या गालावर Kiss करायची Action सुरूवातीपासून कोणी केली, ते नाही दिसले. ह्या फेमिनिस्ट बायका आणि फेमिनिस्ट पुरुष तो कलाकार आहे म्हणून त्याला वाचवत नाहीत तर असे केल्याने काय फरक पडतो म्हणून बचाव करत आहेत. ह्या पोरी आणि बायका पुरुषसत्ताक मानसिकतेच्या आहेत, गरजेचे नाही पुरूषच पुरुषसत्ताक मानसिकतेचे असतील. पुरुष उच्चभ्रू आणि उच्चजातीय असेल, तर त्याचं चारित्र्य निर्दोष मानले जाते. एकूणच, आपल्या भारतात सत्य आणि चारित्र्य दोन्ही बाबी जातीवरूनच ठरवल्या जातात. कारण, उच्चवर्णीय व्यक्तींना नैतिकतेची कोणतेही बंधनं नसतात आणि त्यांच्यावर समाजाकडून कोणतीही टीका होत नाही, त्यांच्या चुकीच्या कामासाठी देखील त्यांना विशेष वागणूक मिळते. तर खालच्या जातीतील लोकांनी काहीही साधी चूक केली नाही तरीही त्यांच्या चारित्र्य बिघडलेले आहे म्हणून समाजाकडून त्यांना दोष दिला जातो. भारतात व्यक्तीचे चारित्र्य, नैतिकता हे त्याच्या जातीवरूनच ठरवले जाते आणि इथेही उदीत नारायणच्या केस मध्ये देखील नैतिकतेचे निकषही त्याच्या जातीवर अवलंबून असतात... कारण त्याचे Brahmin Genes!!!
Comments
Post a Comment