छावा : इतिहासाचं भावनिक शोषण आणि विचारांची गळचेपी
छावा पाहून झाला... संभाजी महाराजांना कसे मारले हे आधीच माहिती असल्यामुळे मी भावूक होऊन चित्रपट पाहण्याचे कटाक्षाने टाळले. चित्रपटातील सर्वांच्या भूमिका चांगल्या होत्या. विकी कौशल पेक्षा अक्षय खन्ना मार खाऊन गेला. रश्मीका मराठी होती नव्हती याने काही जास्त फरक पडला नाही कारण राजा तरी कुठे मराठी दाखवला. संगीताची तर गोष्टच न्यारी, संभाजी महाराजांच्या प्रत्येक भावूक क्षणाला अजान लावण्याचे काम ए. आर. रेहमानने बखुबी निभावले. त्यामुळे, डायरेक्टरला जे दाखवायचे ते त्याने दाखवून दिले आणि मला जे पहायचे होते ते पाहून झाले. काय खरे आणि काय खोटे ते इतिहासाचे गाढे अभ्यासक शोधत बसतील. एक मात्र...चित्रपटामुळे हिंदू मुस्लीम लोकांचा जे काही वाद सुरू झालाय, त्यावरून डायरेक्टर यशस्वी झालाय असे म्हणायला काही हरकत नाही असे मला वाटते. राहिला प्रश्न... आता संभाजी महाराज मुख्य पात्राचा... हा चित्रपट पाहून बामण खुश झाले म्हणजे यातच सर्वकाही आले. बामण खुश झाले म्हणजे समजायचे बामणांचे काहीतरी हित साधले गेले आहे. राजा संभाजीचा इतिहास पडद्यावर कोणीतरी आणला म्हणून लगेच खुश होणार्या लोकांची अक्कल गुडघ्यात आहे म्हणावे लागले. बामण जेंव्हा इतिहास लिहितो आणि तो इतिहास पडद्यावर दाखवतो तेंव्हा त्यांच्या कोणत्याही भूमिका प्रामाणिक नसतात, हे वास्तव आहे. संभाजी महाराजांना इतक्या क्रूरपणे मारले, त्याच्यावर झालेल्या या मारहाणीच्या चर्चेमुळे लोकांना केवळ भावूक करायचे यांचे मनसुबे साधले. परंतु, बामणी लोकांच्या फितुरीमुळे संभाजी कसे औरंगजेबाच्या हाती लागले यावर चर्चा कमी आणि संभाजीचे डोळे फोडण्यापासून ते जीभ तोडून बाहेर काढण्यापर्यंत सर्व चित्रिकरण करण्यात आलेले आहे. मुळात, बामणांना तुमच्यावर झालेल्या अत्याचारात देखील स्टोरी सापडते म्हणजे इतके निर्लज्ज बामण आहेत. यांचे हेतू इतके घाणेरडे असतात की हे तुमच्या दुःखाला तुम्हालाच दाखवून दुःखी करतात. संभाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे शौर्य, त्यांचे राजकारणातील मुत्सद्दीपणा, धर्मनिरपेक्ष विचारधारा, आणि त्यांच्या धोरणातील दूरदृष्टी यावर भर देण्याऐवजी त्यांच्या मृत्यूतील क्रौर्याची तपशीलवार मांडणी का केली गेली? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. लोकांना भावूक करणे, इतिहासाचा बाजार मांडणे, आणि त्यातून आपली बाजू मजबूत करणे. खरेतर, संभाजी महाराजांचा इतिहास जितका गौरवशाली आहे तितकाच तो प्रेरणादायी देखील आहे. परंतु, तो प्रेरणादायी पैलू दाखवण्याऐवजी त्यांच्या मृत्यूची कथा अशा पद्धतीने सादर केली जाते की लोक भावनाविवश होतील. थिएटरच्या बाहेर पडताना डोळ्यातून अश्रू आले पाहिजे, तुम्ही रडले पाहिजे, मारले कसे यावरच चर्चा केली पाहिजे. परंतु, इतिहासातील फितुरीवर पडदा टाकून बामणांना क्लीन चिट द्यायची. छावा चित्रपट केवळ इतिहासाची अपूर्ण मांडणीच करत नाहीत, तर लोकांच्या शुद्ध मानसिकतेवर देखील परिणाम करते आणि एका धर्माच्या विरुद्ध द्वेष निर्माण करते आणि मग बामणांना स्वराजरक्षक संभाजी ऐवजी धर्मवीर संभाजी बोलायची संधी मिळते. लोकांच्या संवेदनशीलतेचा फायदा घेतलेला हा चित्रपट आहे. संभाजी महाराजांचे बलीदान हा त्यांच्या सत्ता स्थापनेच्या संघर्षाचा एक भाग होता आणि हा काही त्यांचा शेवट नव्हता. त्यामुळे त्यांच्या या बलिदानाचे महत्त्व त्यांच्या कार्यात होते आणि त्यांच्या विचारांमध्ये आहे. परंतु, तो विचार समोर आला तर लोकांच्या मनात क्रांतीची ठिणगी पडेल आणि समाजाला आपली खरी ओळख कळेल, म्हणूनच त्या विचारांना चित्रपटात जाणूनबुजून दडपले गेले. इतिहासातील सत्य आणि असत्याचा खेळ खेळताना बामणशाही नेहमीच त्यांची असत्याची बाजू सत्य करून बाजू मांडते, पण या गोष्टीवर कोणताही अभ्यास न करता भावनेच्या भरात वाहून जाणारे प्रेक्षक खऱ्या अर्थाने दोषी आहेत. चित्रपट पाहून बाहेर पडल्यावर केवळ टाळ्या वाजवणे, घोड्यावर बसून थिएटर मध्ये जाणे, संभाजी सारख्या पोषाखात वावरणे, गारद देणे किंवा डोळ्यातून अश्रू ढाळणे इतकाच त्याचा अर्थ घेतला तर बामणांच्या उद्देशालाच महत्त्व देतोय आणि संभाजी महाराजांच्या विचारांची, त्यांच्या लढ्याची आणि त्यांच्या धैर्याची खरी शिकवण गमावतोय. कारण, त्यांच्या जीवनाचा अर्थ केवळ भावनिकतेत नव्हे तर त्यांच्या कर्तृत्वात, ध्येयात आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या त्यांच्या निडर वृत्तीत आहे.
Rating : ⭐⭐⭐ (3/5)
#Chhaava
Comments
Post a Comment