सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी : एक सामाजिक आणि जातीय दृष्टिकोनातून तुलना

काल सचिन तेंडुलकरने रमाकांत आचरेकरांच्या स्मारकाचे अनावरण केले. त्याच कार्यक्रमात सचिनचा जुना सहकारी विनोद कांबळी देखील होता. मिडियाने लगेच सुरू केले, 

"सचिन आपल्या जुन्या सहकाऱ्याला जागेवरून उठून भेटला." 

"अपने दोस्त को देखे के भाऊक हुये सचिन" 

Blah Blah Blah! आणि आपल्याकडे देखील सुरू झाले, गोड गोड लेख लिहून दोघांची तुलना करत, दाखवून द्यायचे सचिन असा, सचिन तसा, सचिन किती प्रेरणादायी. तुलना करतानाही केवळ बाह्य गोष्टींवर आकलन करून खरडत बसून Motivation पर मत ठोकून द्यायचे. बाह्य गोष्टी कोणत्या, सचिनने दारू पिली नाही, जसे काही ही मंडळी चोवीस तास त्याच्या सोबत हिंडतात. दोघांची तुलना करताना दारू इतका साधा निकष. अरे बोला ना, सामाजिक परिस्थितीवर. 

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोघांची तुलना करताना लोक केवळ एकाच बाबींचा उल्लेख का करतात ? दोघांच्या कारकिर्दीची तुलना करताना जात, सामाजिक स्थिती, आणि संधी हे मुद्दे विचारात घ्यायला नको का?

सचिन हा उच्चवर्णीय ब्राह्मण कुटुंबातून येतो. लहानपणापासूनच क्रिकेटसाठी लागणारे सर्व प्रकारचे समर्थन आणि सोयी-सुविधा त्याच्यासाठी उपलब्ध होत्या. सचिन उत्कृष्ट खेळत असला तरी, त्याला मिळालेल्या सामाजिक स्थानामुळे त्याच्या कारकिर्दीला गती मिळाली, हे लक्षात घेतले पाहिजे. याउलट विनोद कांबळी एका अस्पृश्य कुटुंबातून येतो. त्याला आपल्या समाजव्यवस्थेत प्रचंड अडथळे होते. त्याच्याकडे कौशल्य होते म्हणून सुरुवातीला त्याला मान्यता मिळाली. परंतु, नंतर जातीय भेदभाव, सामाजिक परिस्थिती, आणि कुणाचाही पाठिंबा नसल्यामुळे त्याच्यावर मर्यादा आल्यात. 

दोघेही एकाच प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली शिकत असले तरी पुढे जाऊन सचिनला जितका जात व्यवस्थेचा फायदा मिळाला तितका कांबळीला व्यवस्थेमधून मिळाला नाही. मैदानावर देखील त्याला खालच्या दृष्टीकोनातून बघितले जायचे. उलट सचिनला क्रिकेटचा देव म्हणून लोकांनी उचलून धरले. त्याचबरोबर मीडियाने देखील विनोद कांबळीला त्याच्या वैयक्तिक जीवनातील समस्यांवरून लक्ष्य केले, परंतु सचिनच्या चुकांकडे लक्ष दिले नाही. सचिन ब्राम्हण आहे म्हणून त्याच्या चुका देखील माफ केल्या. परंतु, विनोद कांबळीला नाही. सचिनला खराब खेळ खेळूनही कितीवेळा संधी मिळाली, तेच विनोद कांबळीला संधी मिळाली नाही. 

सचिनने मेहनत केली असली तरी, त्याच्या सामाजिक स्थितीने त्याला ज्या प्रकारे मदत केली, तेच कांबळीला मदत झाली नाही. ब्राह्मण असल्यामुळे सचिनला केवळ खेळासाठीच नाही तर स्वताच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठीही पोषक वातावरण मिळाले आणि कांबळीला मात्र सतत संघर्ष करावा लागला. भारतीय क्रिकेट व्यवस्थेमध्ये ज्या प्रकारे उच्चवर्णीय खेळाडूंना प्रोत्साहन मिळते, याप्रकारे मागासवर्गीय खेळाडंच्या प्रतिभेला मिळत नाही, हे सत्य आहे. 

भारतीय क्रिकेट व्यवस्थेमध्ये ज्या प्रकारे उच्चवर्णीय खेळाडूंना प्रोत्साहन मिळते, याप्रकारे मागासवर्गीय खेळाडूंच्या प्रतिभेला मान्यता मिळत नाही. क्रिकेट हा फक्त काही गुणवत्तेचा खेळ नाही, तर तो सामाजिक आणि सांस्कृतिक भेदभावाचाही आरसा आहे हे लक्षात घेतले पाहिजे आणि कांबळीची कारकीर्द हा याचा जिवंत महत्वपूर्ण पुरावा आहे. त्यामुळे केवळ वरवरचे मुडी मांडून दोघांची तुलना करणे बंद केले पाहिजे. जरा मुळापासून सामाजिक परिस्थितीतून ,जात व्यवस्थेचा विचार करून दोघांच्या कारकीर्दवर बोलले पाहिजे.

दारू पिणे वाईटच आहे, पण सचिन आणि कांबळीची तुलना फक्त दारूवरून करणे म्हणजे जातीव्यवस्थेच्या वास्तवाला नाकारणे होय. क्रिकेटमधील जातीय विषमता लक्षात न घेता अशा प्रकारे तुलना करणे चुकीचे आहे. कांबळीची संघर्षमय कारकीर्द ही भारतीय क्रिकेटमधील जातीय असमानतेचा एक महत्त्वाचा पुरावा आहे, हे नाकारून चालणार नाही.

Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली