रामराज्याचा भ्रम आणि बुद्धाचे शाश्वत विचार

ज्या रामाला हिंदुत्ववाद्यांनी इतके गौरवान्वित करून महत्व पटून दिले , तिथे आजही रामाच्या नाकावर टिच्चून जगात बुद्धाचेच नाव घेऊन भारताची ओळख सांगावी लागते. रामाचे नाव घेऊन किती राजकारण झाले वेगळे सांगायला नको. काल्पनिक रामाच्या कथा सांगून रामाला नायक म्हणून देवघरात बसवलेल्या रामाचे पुरावे आजही लोकांना मिळाले नाही. भारतात हिंदुत्ववादी नेत्यांनी रामाचे नाव वापरून इथे कितीही राजकारण केले तरी जागतिक स्तरावर ते आजही रामाच्या नावाने प्रभाव पाडू शकत नाहीत. भारतात बुद्धाला मान्यता नसली तरी, जगभरात बुद्धाला मात्र शांती, करुणा आणि मानवतावादाचे प्रतीक म्हणून मोठा सन्मान मिळतो. याउलट राम मात्र प्रामुख्याने हिंदुत्ववादी विचारसरणीशी कट्टरतेने जोडला गेला. बुद्धाचे विचार आणि तत्त्वज्ञान हे मानवी उत्कर्षाच्या दिशेने आहे, ज्यामध्ये समतेवर आधारित समाजाचा पाया आहे. जिथे हिंसा आणि द्वेषाला कुठेही थारा नाही. याउलट रामाच्या नावाने मात्र हिंदुत्ववादी गटांमध्ये हिंसा, दंगे, कट्टरता फोफावलेली दिसते. रामाचा प्रतिकात्मक अर्थ मुख्यतः हिंसाचारातच दिसतो. त्यामुळेच हिंदुत्ववादी नेत्यांना नाईलाजाने, जागतिक पातळीवर आदर मिळवण्यासाठी रामाऐवजी बुद्धाचे नाव घेण्यास प्रवृत्त होतात. कधी एकेकाळी ज्या लोकांनी बुद्धाला मातीमध्ये गाडण्याचा प्रयत्न केला, त्यांनाच आता जगात आपली प्रतिष्ठा मिळवण्यासाठी बुद्धाच्याच नावाचा आधार घ्यावा लागत आहे. कसा असतो ना काळाचा महिमा! ज्यांनी इतिहासात बुद्धाच्या विचारांवर आघात केले, त्यांनी त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देण्याचा प्रयत्न केला, त्यांनाच आता बुद्धाचे तत्त्वज्ञान वापरून स्वतःला प्रतिष्ठित करावे लागत आहे. हा बुद्धाच्या प्रज्ञेचा घाव आहे, जो शस्त्राच्या घावापेक्षा खूपच खोल आणि परिणामकारक आहे. कारण बुद्धाचे विचार शाश्वत आहेत, ते शस्त्रांप्रमाणे नष्ट होत नाहीत. उलट त्यांची शक्ति काळाच्या ओघात अधिक वाढत जाते. बुद्ध केवळ , धर्मापुरता किंवा तत्वज्ञाना पुरता मर्यादित नसून नव्या समाजव्यवस्थेची आणि मानवी मूल्यांची पुनर्रचना करणारा आहे. बुद्धाच्या प्रज्ञेचा घाव रामाच्या धनुष्यापेक्षा खोल आहे , कारण तो लोकांच्या मनात विचारांची क्रांती घडवतो! 💚

Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली