पुरुष दिन...
प्लेटो म्हणतो , "आपण समाजाच्या नियमांनी बांधलेले गुलाम असतो , जोपर्यंत आपण आपल्या स्वाभाविक स्वातंत्र्याचा शोध घेत नाही." प्लेटोचा हा विचार पुरुष दिनानिमित्ताने पुरुषांना तंतोतंत लागू पडतो. समाजाने पुरुषांसाठी ठरवलेल्या चौकटीबाहेर पुरुषाने जगायचे ठरवले तरी , त्यांच्या स्वाभाविक स्वातंत्र्याच्या मर्यादेबाहेर ते जगू शकत नाहीत. कर्तव्याचे ओझे , जबाबदारीची चौकट , आणि भावनाशून्यतेचा मुखवटा एकाचवेळी ते अनेक बाबींचा सामना करतात. लहानपणापासून पुरुषांना शिकवले जाते , 'तू मुलगा/पुरुष आहेस आणि तू रडू शकत नाहीस.' अशाप्रकारे त्यांच्यावर तिथूनच कर्तव्याची जबाबदारी टाकली जाते आणि कधीही रडू नको म्हणून त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देण्याची इच्छा मारली जाते. पुरुषांच्या वेदना , संघर्ष , जबाबदारी , यापलिकडे पुरुषांचे माणूस म्हणून अस्तित्व स्विकार करण्यासाठी पुरुषांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे , मी माणूस म्हणून कधीतरी जगतो का? मलाही भावना आहेत , कधीतरी माझे मन मोकळे केले आहे का? सर्वांच्या नजरेत मी खुश राहावे म्हणून मी माझे मन मारून का जगतो? आई - वडील , बहीण , भाऊ , बायको , प्रे...