वाचन आणि विवेकवाद

तुम्ही वाचन खूप करत आहात आणि तुमची Rational Thinking जर Develop होत नसेल तर ते वाचन निरर्थक ठरते. केवळ वाचन करणारे लोक माहितीचा साठा जमा करत असतात , त्यावर विचारविमर्श करत नसतात. इथे काही लोक वाचनासाठी प्रसिद्ध आहेत तर काही लोक पुस्तक हातात घेऊन फोटो पोस्ट करण्यापुरती. केवळ पुस्तके वाचून किंवा माहिती मिळवून कोणीही विवेकवादी ठरत नाही. विवेकवादाचा अर्थ आहे , त्या माहितीचे तर्कबुद्धीने विश्लेषण करून आपल्या विचारसरणीत आणणे, त्यातून योग्य निष्कर्ष काढून , त्यानुसार आचरण करणे. इथे असणारे पुरोगामी आम्ही किती Progressive विचारांचे आहोत हे सतत दाखवत असतात , परंतु त्यांचा Progressive पणा लगेच दिसून पडतो , आम्ही किती Progressive आहोत ते. फुले , शाहू , आंबेडकर यांचे वाचन केले तरी जर तुम्ही त्यांचे विचार तात्त्विक आणि तर्कशुद्ध रीतीने आचरणात आणत नसाल , तर ते वाचन निरर्थक ठरते. Twitter वरील काही लोक पुस्तकप्रेमी म्हणून प्रसिद्ध आहेत. अगदी फुलांपेक्षा मला पुस्तक देऊन प्रपोज करावे इथपर्यंत त्यांचे पुस्तकांप्रती प्रेम उतू गेलेले आहे. लग्नात देखील आहेरांऐवजी ते पुस्तकेच नातलगांना भेट देतील इतके पुस्तक ते वाचत असतात. पुस्तकांची गुढी , लक्ष्मी समोर पुस्तकांचा देखावा काय? पुस्तकप्रेमी लोकांनी असणार्‍यांनी ‘पुस्तकाच्या प्रेमाची’ संकल्पना यावरच आधारित केली आहे. समाजातील काही लोक स्वतःला किती मोठे वाचक म्हणून प्रस्थापित करत आहेत , पण वाचनातून विवेकबुद्धी कशी विकसित करायची , हा मुद्दा बाजूलाच राहतो. आपण किती पुस्तके वाचली हे दाखवणे म्हणजे प्रगतीशीलता नव्हे. तुमचे वाचन अफाट असेल आणि त्यामुळे तुमची Rational Thinking Develop होतच नसेल तर ते वाचन केवळ समाजापुढे स्वतःचे बौद्धिक ब्रँडिंग करणे होय... 

Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली