पेरियार विरुद्ध शरद पाटील : बहुजनांच्या विचारधारेची दिशा...

CJI चंद्रचूड आणि पंतप्रधान दोघांनी एकत्रित मिळून गणपतीची आरती करणे , ही घटना फक्त आरती करण्यापुरती पुरती मर्यादित नाही , तर संपूर्ण संविधानाच्या स्वायत्ततेवर हल्ला आहे. संविधानाच्या मूळ गाभ्याला धक्का लावून , त्याच्या मूल्यांचा सार्वजनिकरीत्या अपमान केला जात आहे. भारतीय लोकशाहीचे मुख्य आधारस्तंभ असलेल्या Judiciary, Legislature, आणि Executive या तिन्ही संस्था आज धार्मिक आणि सांस्कृतिक वर्चस्ववाद्यांच्या हातातील खेळणे बनल्या आहेत आणि Media बद्दल तर बोलायलाच नको. गणपती पूजा किंवा इतर कोणत्याही धार्मिक सोहळ्यांत सहभागी होणे हे व्यक्तिगत अधिकार असू शकतो , पण जेव्हा देशाचे सर्वोच्च न्यायाधीश आणि पंतप्रधान सार्वजनिकरित्या असे धार्मिक प्रदर्शन करतात , तेव्हा त्यामागचा अर्थ मोठा व्यापक असतो. आपली न्यायव्यवस्था स्वतंत्र असल्याचे आता फक्त एक आभासी चित्र उरले आहे. मात्र वास्तविकता अशी आहे की , त्या न्यायव्यवस्थेवर विशिष्ट जातीचा , हिंदुत्ववादी विचारसरणीचा खोलवर प्रभाव पडत चालला आहे. निर्णय घेणारे न्यायाधीश आणि त्यांच्या निर्णयांवर होणारा दबाव आता कोणत्या दिशेने आहे , हे आपल्याला अशा वागण्यातून दिसून येते. सुप्रीम कोर्टाच्या मागील काही अनेक निर्णयातून ब्राह्मणवादी विचारधारांचा परिणाम स्पष्टपणे दिसून आला आणि ज्यात बहुजन समाजाच्या मुद्द्यांवर ठोस न्याय देण्याऐवजी त्यांच्या हक्कांवर पद्धतशीर गदा आणली. न्यायव्यवस्थेची स्वायत्तता आणि तटस्थता जर अशा प्रकारे भ्रष्ट केली गेली , तर त्याचे अंतिम परिणाम काय होतील , याचा विचार न केलेला बरा. बहुजन समाजाचा न्याय मिळवण्याचा अधिकार पुन्हा एकदा गमावला जाईल , आणि एकट्या ब्राह्मण आणि उच्चवर्णीयांच्या हितसंबंधांना जपण्यासाठीच न्याय दिला जातो हे आता स्पष्ट झाले. यामुळे भारतीय लोकशाहीचा आणि संविधानाचा आत्मा आता कागदापुरता मर्यादित झाला आहे. ब्राह्मणवादी विचारसरणीने आज सर्वोच्च स्थाने हस्तगत केली आहेत , आणि त्यांचे निर्णय बहुजनांच्या हक्कांना दुर्लक्षित करत आहेत. हे वातावरण भितीदायक आहे , कारण एकीकडे भाजपा सरकार बहुसंख्य हिंदू मतदारांना जोडण्यासाठी हिंदुत्वाच्या अजेंड्याचा वापर करते. म्हणण्याचे नाकारणारे आणि स्वतः मात्र सरंजामी अलंकार असलेले पाटील आडनाव लावुन रामायण महाभारतातील काल्पनिक पात्रांना ब्राम्हणी - अब्राम्हणी मांडणीच्या नावाखाली त्यांचे योगदान स्पष्ट करून आणि राम , कृष्ण यांचे बाबासाहेबांनी सकारात्मक महत्व नोंदविले नाही अशी टीका करणारे , बाबासाहेबांची मांडणी एक प्रवाही अन्वेषण पद्धती आणि माझी बहुप्रवाही अन्वेषण पद्धती आहे ,अशी मांडणी करणारे मार्क्‍सवादी सरंजामी शरद पाटील यांनी कोणता ज्ञानाचा 5000 वर्षाचा बॅकलॉग भरून काढला? बहुजनांचे पहिले इंडोलॉजिस्ट म्हणण्यापेक्षा मराठ्यांचे इंडोलॉजिस्ट म्हटले तर बरे होईल. होतात. कशावरुन यांना बहुजनांचे विद्वान म्हणायचे? मार्क्‍सवादी इतिहासकार इरफान हबीब यांचे सोयीनुसार संदर्भ वापरुन बुद्धांवर स्त्री-पुरुष विषमतावादी ठपका ठेवणारे शरद पाटील यांची हवा डोक्यात घुसलेले त्यांचे अनुयायी देखील बुद्धांना स्त्री-पुरुष विषमतावादी ठरवायला कमी करत नाहीत. बाबासाहेबांनी जाती अंत कुठे केला , असे प्रश्न विचारून , बाबासाहेबांनी केवळ धर्मातंर केले , असे आरोप करणारे शरद पाटील कोणत्या पातळीवर विद्वान ठरतात? बहुजनांना मूर्ख बनविण्याचे काम केलेल्या शरद पाटलांना बहुजनांचे विद्वान म्हणणे म्हणजे किती हास्यास्पद आहे. शरद पाटील यांची अवास्तव स्तुती करून , त्यांना विनाकारण बाबासाहेबांच्या पेक्षा मोठे दाखविण्याचा उत्तम प्रयत्न त्यांचे अनुयायी करतात. बाबासाहेबांच्या अनुयायांना शरद पाटील आपल्या माफुआ पुस्तकातून आंबेडकर भक्त म्हणून त्यांच्यावर टीका करतात , हे त्यांच्या शरद पाटलांच्या अनुयायांना दिसत नाही. शरद पाटलांनी कसे ब्राह्मणी आदर्शवादाला एका नव्या स्वरूपात बहुजन समाजासमोर मांडले ह्याकडे देखील ते पूर्णपणे डोळेझाकच करतात. मार्क्सवादी विचारसरणीचा आधार घेत शरद पाटील यांनी बहुजन समाजावर पुन्हा त्याच ब्राह्मणी आदर्शांना लादण्याचा प्रयत्न केला , ज्यांच्यामुळे समाजाची विचारशक्ती बंदिस्त झाली आणि आता त्यांचे अनुसरन करण्याऱ्या लोकांची देखील यामुळे विचारसरणी बंद झालेली तुम्हाला दिसेल. याउलट पेरियार रामस्वामी यांची भूमिका वाखाणण्याजोगी आहे, ब्राम्हणी-अब्राम्हणी मांडणीच्या मागे न लागता थेट त्यांनी ब्राम्हणी व्यवस्थेला आव्हान दिले आणि ती व्यवस्थाच उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. राम आणि कृष्णाचे चांगले गुण शोधण्यापेक्षा रामायणातील रामासारख्या पात्रांवर उघड टीका केली , आणि त्यांच्या अनुयायांनी रामाच्या पुतळ्यांना चप्पल घालून मिरवणूक काढली. पेरियार यांच्या विचारसरणीमुळे ब्राह्मणी व्यवस्थेचा खरा चेहरा उघड झाला , ज्यामुळे बहुजन समाजात आत्मसन्मान आणि जागरूकता निर्माण झाली. पेरियार यांची विचारसरणी केवळ शब्दांपुरती मर्यादित नव्हती , तर ती त्यांनी कृतीतून सिध्द केली गेली. पुरोगामी चळवळीचे नेतृत्व करणारे लोक अशी छुपी भूमिका घेतात , कोणतीच ठाम भूमिका त्यांना घेता येत नाही , त्यामुळे अशा चळवळी समाजात परिवर्तन घडवण्याऐवजी तेवढ्यापुरते राजकारण करण्यापुरत्या मर्यादित राहतात. परिवर्तनाचा लवलेश देखील नसतो अशा चळवळींना. शरद पाटील यांची आज जयंती आहे , तसेच पेरियार रामस्वामी यांची देखील जयंती आहे. शरद पाटील यांचे कोणी कितीही उदात्तीकरण केले तरी , शरद पाटील हे अहंकारी , जातीयवादी होते , महत्वाचे म्हणजे आत्ममग्न आणि गोंधळलेले होते , याउलट पेरियार रामस्वामी हे निर्भीडपणे भूमिका मांडणारे होते. पेरियार यांच्यासारख्या निर्भीड आणि ठाम नेत्यांची महाराष्ट्राला आज खूप गरज आहे. जर पुरोगामी चळवळींना खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल , तर त्यांना पेरियार यांच्या धाडसी मार्गाचा अंगीकार करावा लागेल. फक्त चर्चांच्या आणि विचारांच्या पातळीवरच नाही , तर प्रत्यक्ष कृतीतून ब्राह्मणी व्यवस्थेला प्रश्न विचारणे आणि त्यांचा प्रतिकार करणे अत्यावश्यक आहे. शरद पाटील यांच्या अनुयायांसकट गोंधळलेल्या , पुरोगामी चळवळीचे वाटोळे झालेच आहे , आता बहुजनांनी कुणाला स्वीकारायचे ते ठरवायचे आहे. कारण , शरद पाटील यांची तथाकथित प्रगतीशील मांडणी बहुजन समाजाला दिशाभूल करणारी आहे , तर पेरियार रामस्वामी यांनी बहुजनांना खरा आत्मसन्मान दिला. पेरियार यांची निर्भीड विचारसरणीच आणि ठाम कृती पुरोगामी चळवळींसाठी मार्गदर्शक ठरू शकते.


Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली