बुद्ध आणि मैत्री...
बुद्ध आपल्या संघात मैत्री कशी असावी आणि ती कशी निभावावी पाहिजे , याबद्दल संघात विशेष मार्गदर्शन करीत. बुद्ध धम्माची शिकवण देताना बुद्ध म्हणत -
"धम्म हा तेव्हाच सद्धम्म आहे जेव्हा तो अशी शिकवण देतो की करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक... "
यावरून आपल्या लक्षात येईल की,
बुद्ध केवळ 'करुणा' शिकवून थांबले नाहीत.
करुणा म्हणजे प्राणिमात्रासंबंधी दया करणे होय. परंतु, बुद्धानी यापलीकडे जाऊन मैत्री शिकविली. मैत्री म्हणजे अखिल जीव-जातीसंबंधी प्राणिमात्रासंबंधी दयाभाव, करुणेपर्यंत जाऊन न थांबता, पुढे जाऊन अखिल प्राणिमात्राबद्दल मैत्रीची भावना ठेवली पाहिजे, अशी बुद्धांची शिकवण आहे.
मैत्री संबंधी बोलताना बुद्ध भिक्खूंना म्हणतात -
समजा, एक मनुष्य एक विहीर खोदण्यात पृथ्वीला खोदतो, तेव्हा पृथ्वी त्याच्यावर रागावते काय?
भिक्खूंनी उत्तर दिले - "नाही भगवान"
बुद्ध पुढे आणखी एक प्रश्न विचारतात,
समजा, एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगवू लागला तर तो चित्र रंगवू शकेल असे तुम्हाला वाटते काय ?
"नाही, भन्ते !"
"का नाही?"
भिक्खू म्हणाले, "कारण हवेत असे काळे फलक नाहीत की, ज्यावर रंग भरता येतील."
त्यावर बुद्ध म्हणतात -
"त्याप्रमाणेच तुमच्या मनातही काळे डाग असता कामा नये, कारण मनाचे डाग हे दूर्विचारांचेच प्रतिबिंब असतात.
बुद्धाची आणखी एक कल्याण मित्राची संकल्पना
महत्वपूर्ण आहे -
बुद्धाच्या काळात काही लोकांना बुद्धाच्या कार्याबद्दल माहिती नव्हते आणि भिख्खू ज्यावेळी आशा लोकांच्या घरी जात, त्यावेळी हे भिख्खू पाहून त्या लोकांना संताप येत असे. भिक्खूंना पाहून शिवीगाळ करणे नित्यनेमाने होत असे. अशावेळी भिख्खू भिक्षेविणा परतत. तरीही भिख्खू ते लोक दरवाजा उघडेपर्यंत मंगल मैत्री करीत असत. म्हणजे त्या घरातील कुटुंबाच्या सदस्यांसाठी प्रार्थना म्हणायचे. याउलट बुद्धाच्या कार्याबद्दल माहिती असणार्यांना भिख्खू दारावर आले की, त्यांना आनंद होत असे.
याचाच अर्थ असा की,
जे आपले हितचिंतक आहेत, आपल्यासाठी मंगल मैत्रीची कामना करत आहेत त्यांनाच ते आपल्या दारातून हाकलून देतात. परंतु, हे समजले पाहिजे, आपल्याला पुढे नेणारे आणि आपले हित चिंतनारे लोक आयुष्यात असणे गरजेचे आहे.
मैत्री संबंधी बद्दल समजून सांगताना बुद्ध खालील महत्वपूर्ण बाबींचे विवेचन करतात -
1) ज्याप्रमाणे पृथ्वीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागावत नांही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगाजळ सारखे वाहात राहते, त्याप्रमाणे, तुम्ही दुसऱ्याने तुम्ही दुसऱ्याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्याच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे.
2) मैत्री ही सतत आणि निरंतर वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. असा जर तुम्ही मैत्रीचा अभ्यास केला तर कोणी तुमच्यासोबत कितीही वाईट आणि अप्रिय व्यवहार केला, तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही. कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात.
3) तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासारखा अमर्याद असावा, तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यांत द्वेषाचा लवलेशही नसावा.
4) माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही, त्यात मैत्रीचे आचरण आवश्यक आहे.
5) मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता. ती आपल्यामध्ये सर्व पुण्यकृत्यानी समाविष्ट करून घेते. ती चमकते, प्रकाशते, ती प्रज्वलित होते.
संदर्भ ~
बुद्ध आणि त्यांचा धम्म - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Comments
Post a Comment