मराठा आरक्षण...
मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे यात काही दुमतच नाही. परंतु, मराठा खरच स्वतःला मागासवर्गीय म्हणून घेण्यास तयार आहे का? कारण, आरक्षण मागासवर्गीय लोकांसाठी आहे. आरक्षण मिळाले तरीही गोरगरिबांना या आरक्षणाचा काहीही एक फायदा होणार नाही कारण आजही गरिबांना लुबाडणारा
श्रीमंत वर्ग आहे. गरिबांच्या आरक्षणाचा फायदा श्रीमंत लोक घेणार नाहीत कशावरून? आरक्षण मिळाले तरीही गोरगरिबांना हे श्रीमंत मराठे फायदा होऊ देणार नाहीत. आरक्षण हे आर्थिक निकषावर दिले पाहिजे असा मुद्दा उपस्थित करत आहेत? आर्थिक निकषावर गरीब - श्रीमंत मराठे तुम्ही कसे ठरवणार? कारण,श्रीमंत मराठे आम्ही कसे गरीब मराठे आहोत हे सिद्ध करण्यासाठी धडपडणार व गरीब मराठ्यांची स्थिती जैसे थे राहण्याची पुन्हा एकदा दाट शक्यता आहे. मराठ्यांनी आजपर्यंत सर्व क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे मग श्रीमंत असणारे मराठे का गरीब मराठ्यांना पुढे घेऊन जात नाही?
आजही श्रीमंत मराठ्यांच्या संस्था, कारखाने, शाळा कितीतरी बाबी आहेत. मी असेही श्रीमंत मराठे पाहिले, स्वतःच्या संस्था काढल्यात, व संस्थेतील कर्मचारी वर्ग संस्थेच्या मालकाच्या घरच्या फरश्या पुसण्याचे काम करतो. कुठली मानसिकता आहे ही? म्हणजे, तुम्ही त्यांना संस्थेत सुद्धा राबवून घेणार व घरीही साफसफाई करायला लावणार? मर्द मराठा असाल तर प्रामाणिकपणे स्वतःलाच प्रश्न विचारून पहा, " खरंच, आपल्याला आरक्षण हवे आहे का?" तुमचे मनही तुम्हाला सांगेन, आम्हाला आरक्षण नको आहे. इतर जातीबद्दल मनात आकस ठेऊन जर तुम्ही आरक्षण मागत असाल तर कदापिही ते आरक्षण तुम्हाला मिळणार नाही. आरक्षण मिळाले तरी मग, महार, चांभार, भंगी लोकांसारखे गटारे साफ करण्याच्या जागेवर सुद्धा मग मराठ्यांनी अर्ज केले पाहिजेत. दलितांनीच का मग नाल्या, गटारे साफसफाईचे काम करायचे? मराठ्यांना आता कुठे दलित वर्ग पुढे जातोय म्हणून डोळ्यामध्ये सलत आहे. इतके वर्षे महारानी काय केले याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. आरक्षण मिळाले तर, महारासोबत रस्ते, नाल्या, गटारे साफ करण्यासाठी सुद्धा मराठा तरुणांनी सहभाग नोंदविला पाहिजे. दलितांनी शिक्षण घेतले फक्त इतकेच पाहू नका तर गुरेढोरांचे मास सुद्धा उचलले याकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. फक्त, महारांनी
ठेका नाही घेतला. दलित लोक आमची कधीच बरोबरी करू शकत नाही म्हणणाऱ्या मराठ्यांनी आता तुम्हीच आरक्षण मागून दलितांची बरोबरी सिद्ध करण्यासाठी धडपडत आहात. मराठ्यांनी वास्तविकतेकडे लक्ष दिले पाहिजे. इथे फक्त, मार्क, शिक्षण इतकेच मुद्दे आरक्षणाला धरून नसतात तर असंख्य मुद्दे यात आहेत.आरक्षण आहे म्हणून सरकारने अभ्यासाचा क्रायटेरिया ठरवुन नाही दिला आहे. मला तर वाटते मग, दलितांना आरक्षण आहे तर त्यांचा अभ्यासक्रम कमी करायला पाहिजे. कशाला अभ्यासक्रम सारखा ठेवायचा? कमी मार्कांवर नंबर लागतो म्हणून कुणी जाणूनबुजून अभ्यास कमी करत नाही.
अभ्यास सर्वांना सारखाच करावा लागतो, सारखीच , मेहनत प्रत्येकाला घ्यावी लागते. आरक्षण आहे म्हणून दलितांनी अभ्यास कमी करावा असे कोणतेही सरकार म्हणत नाही. आरक्षणाच्या मुद्द्यांना घेऊन खूप मोठी चर्चा करता येईल. एक लक्षात ठेवावे आरक्षण आहे म्हणून दलित पुढे गेले व मराठे मागे राहिलेअसे सिद्ध करण्यासाठी उपोषणाला बसण्याची काहीही गरज नाही. उपोषणाला बसायचे असल्यास कुणीतरी श्रीमंत मराठ्यांनी उपोषणाला बसावे कशाला गरीब मराठ्यांनी स्वतःला त्रास करून घ्यावा? उद्या काही कमी जास्त झाले तर, श्रीमंत मराठा जबाबदारी घेणार आहे का कुटुंबाची? अरे, मागणीमध्ये इतकी ताकत ठेवा
सरकार झुकले पाहिले आरक्षण देण्यासाठी. अभ्यास इतका करा की, मराठे मागासवर्गीय आहेत हे कोर्टात सिद्ध झाले पाहिजे. उपोषणाला बसून सरकारला किती दिवस ब्लॅकमेल करता येईल व सरकार सुद्धा किती दिवस मनावर घेणार आहे? एक मराठा, लाख मराठा ही घोषणा आहे ना? एका मराठ्याची बरोबरी एक लाख मराठासरकार झुकले पाहिले आरक्षण देण्यासाठी. अभ्यास इतका करा की, मराठे मागासवर्गीय आहेत हे कोर्टात सिद्ध झाले पाहिजे. उपोषणाला बसून सरकारला किती दिवस ब्लॅकमेल करता येईल व सरकार सुद्धा किती दिवस मनावर घेणार आहे? एक मराठा, लाख मराठा ही घोषणा आहे ना? एका मराठ्याची बरोबरी एक लाख मराठा
बरोबर आहे. उपोषणाला बसण्याची काहीही आवश्यकता नाही आहे, अभ्यासपूर्वक मराठ्यांनी आता स्वतःला सिद्ध केले पाहिजे व आम्ही कसे आरक्षणासाठी पात्र आहोत हे समजावून सांगितले पाहिजे. आरक्षण मिळाले तर गरिबांना त्याचा लाभ झाला पाहिजे व नाही मिळाले तर श्रीमंत मराठ्यांनी श्रीमंत वर्ग आहे. गरिबांच्या आरक्षणाचा फायदा श्रीमंत लोक घेणार नाहीत कशावरून? आरक्षण मिळाले तरीही गोरगरिबांना हे श्रीमंत मराठे फायदा होऊ देणार नाहीत. आरक्षण हे आर्थिक निकषावर दिले पाहिजे असा मुद्दा उपस्थित करत आहेत? आर्थिक निकषावर गरीब - श्रीमंत मराठे तुम्ही कसे ठरवणार? कारण,
Comments
Post a Comment