शिर्डीपासून अक्कलकोटपर्यंत : बाबावादाचे ब्राह्मणी षड्यंत्र
ज्या लोकांना जन्मतारखा नसतात त्यांचे प्रकटदिन साजऱ्या केल्या जातात. शिर्डीचे साईबाबा , शेगावचे गजाजन बाबा आणि नव्यानेच ज्यांचे प्रस्थ वाढत चालले आहे ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ. ह्या तिन्ही बाबांचे महाराष्ट्रात प्रकटदिन साजरे केले जातात. कारण , ब्रिटीशांच्या कार्यकाळात हे बाबा होऊन गेले असा दावा केल्या जातो , तरी त्यांच्या जन्मतारखेच्या कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंटेशन झालेले नाही. प्रश्न हा आहे की , मग हे प्रकट कसे झाले? कोणी केले? कुठून आले? आणि आता बहुजनांच्या माथ्यावर कोणी मारले? ग्रामीण भागात पहिले विठ्ठल एकच देवता होती , तेही देवता नव्हते माणूस होते आणि तेच लोकांना प्रिय होते. पण मागील काही काळामध्ये विठ्ठलाचे महत्व कमी करून ह्या तिन्ही बाबांचे महत्व महाराष्ट्रात वाढलेले आपल्याला दिसेल. विठ्ठलाची उपासना ही महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या सांस्कृतिक ओळखीशी निगडीत आहे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ही ओळख प्रबळ झाली , आणि त्याचे केंद्रबिंदू पंढरपूर राहिले आहे , हा इतिहास आहे. पण ह्या तिन्ही बाबांनी काय केले आहे समाजासाठी? कोणता इतिहास आहे यांचा? ब्रम्हांड नायक म्हणून मिरवणाऱ्या या...