छावा : इतिहासाचं भावनिक शोषण आणि विचारांची गळचेपी
छावा पाहून झाला... संभाजी महाराजांना कसे मारले हे आधीच माहिती असल्यामुळे मी भावूक होऊन चित्रपट पाहण्याचे कटाक्षाने टाळले. चित्रपटातील सर्वांच्या भूमिका चांगल्या होत्या. विकी कौशल पेक्षा अक्षय खन्ना मार खाऊन गेला. रश्मीका मराठी होती नव्हती याने काही जास्त फरक पडला नाही कारण राजा तरी कुठे मराठी दाखवला. संगीताची तर गोष्टच न्यारी, संभाजी महाराजांच्या प्रत्येक भावूक क्षणाला अजान लावण्याचे काम ए. आर. रेहमानने बखुबी निभावले. त्यामुळे, डायरेक्टरला जे दाखवायचे ते त्याने दाखवून दिले आणि मला जे पहायचे होते ते पाहून झाले. काय खरे आणि काय खोटे ते इतिहासाचे गाढे अभ्यासक शोधत बसतील. एक मात्र...चित्रपटामुळे हिंदू मुस्लीम लोकांचा जे काही वाद सुरू झालाय, त्यावरून डायरेक्टर यशस्वी झालाय असे म्हणायला काही हरकत नाही असे मला वाटते. राहिला प्रश्न... आता संभाजी महाराज मुख्य पात्राचा... हा चित्रपट पाहून बामण खुश झाले म्हणजे यातच सर्वकाही आले. बामण खुश झाले म्हणजे समजायचे बामणांचे काहीतरी हित साधले गेले आहे. राजा संभाजीचा इतिहास पडद्यावर कोणीतरी आणला म्हणून लगेच खुश होणार्या लोकांची अक्कल गुडघ्यात आहे म्हणावे ...