Posts

Showing posts from December, 2024

मी बुद्ध आहे...

माझा लहान भाऊ प्रवासात होता आणि रस्त्यात पोलीस Alcohol Test घेत होते. एकदा टेस्ट घेतली तरीही पोलिसांना खरे वाटेना. पोलिसांना वाटले कदाचित ह्याने दारू पिली, एकदा टेस्ट घेतली, काही आढळले नाही, तो पोलीस परत टेस्ट घेत होता. शेवटी माझा भाऊ म्हणाला, "अहो सर, मी 'बुद्ध' आहे." त्या एका वाक्याने पोलीसाने त्याला विश्वासाने, 'बरं, बरं" म्हटले, आणि पुढे जाऊ दिले. सांगण्याचे तात्पर्य - आजच्या भांडवली चंगळवादी जीवनात, आपल्या धम्माने दिलेली शिकवण आजही किती प्रभावशाली आहे याचे हे उदाहरण आहे. बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि त्यांचे पालन केले तर आपल्या जीवनाकडे एका आदर्श दृष्टीकोनातून बघितल्या जाते. असे काही प्रसंग आपल्या आयुष्यात येतात तेंव्हा, "मी बुद्ध आहे," हे एक वाक्य आपल्या सत्यतेचा, प्रामाणिकपणाचा आणि संयमाचा दाखला देतो. आजही आपल्या धम्माचे नाव घेतल्यावर लोकांच्या मनात लगेचच एक आदर आणि विश्वास निर्माण होतो. दुसरे कठोर वास्तव म्हणजे, आपल्याच समाजातील भांडवली, चंगळवादी जीवनाला हुरळून गेलेले मुले बुद्धाच्या शिकवणीपासून...

प्रेमाची सांस्कृतिक प्रोग्रामिंग

❛❛प्रेम एकदाच होते म्हणणार्‍यांसाठी... ❜❜ प्रेम एकदाच होते, म्हणणाऱ्या तेरे नाम मधील सलमान खानच्या भक्तानों आणि त्याच्याच भक्तीला भुलून आत्महत्या करणार्‍या निर्जलाच्या भक्तिंनींनो, तुमच्या डोक्यातील विचारसरणीतच त्रुटी आहे. तुम्हाला वाटते, प्रेम आयुष्यात फक्त एकदाच होते. परंतु, वास्तवाकडे दुर्लक्ष करून तुम्हाला केवळ Bollywood सिनेमाच्या कल्पनांना हवा देण्याची वाईट सवय असावी. सिनेमा आणि साहित्यिकांनी प्रेमासारख्या साधारण घटनेला अवास्तव महत्व देऊन प्रेमाबद्दल खुळचट कल्पना तयार केल्या आणि तुम्ही त्याच अंगीकारल्या. प्रेम एकदाच होतेच्या नावाखाली लोक आत्महत्या करतात, विष घेतात, नैराश्यात जातात, का जातात कधी विचार केला आहे का? तुमच्या अशा मनोरंजनात्मक कल्पनांमुळे, सोडून गेलेल्या एकाच प्रेमासाठी झुरल्यामुळे, एकाच प्रेमाच्या चौकटीत अडकल्यामुळे. खरंतर प्रेम ही माणसाच्या आयुष्यात सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे. परंतु, तुमचे डोके कवी-साहित्यिकांच्या भावनिक कल्पनांनी प्रोग्राम झाले आहे आणि त्यामुळे तुम्ही प्रेमाला अवास्तव महत्त्व देता. कवी किंवा साहित्यिकांनी प्रेमाचे एक आकर्षक रूप मांडले आणि ते काय...

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी : एक सामाजिक आणि जातीय दृष्टिकोनातून तुलना

काल सचिन तेंडुलकरने रमाकांत आचरेकरांच्या स्मारकाचे अनावरण केले. त्याच कार्यक्रमात सचिनचा जुना सहकारी विनोद कांबळी देखील होता. मिडियाने लगेच सुरू केले,  "सचिन आपल्या जुन्या सहकाऱ्याला जागेवरून उठून भेटला."  "अपने दोस्त को देखे के भाऊक हुये सचिन"  Blah Blah Blah! आणि आपल्याकडे देखील सुरू झाले, गोड गोड लेख लिहून दोघांची तुलना करत, दाखवून द्यायचे सचिन असा, सचिन तसा, सचिन किती प्रेरणादायी. तुलना करतानाही केवळ बाह्य गोष्टींवर आकलन करून खरडत बसून Motivation पर मत ठोकून द्यायचे. बाह्य गोष्टी कोणत्या, सचिनने दारू पिली नाही, जसे काही ही मंडळी चोवीस तास त्याच्या सोबत हिंडतात. दोघांची तुलना करताना दारू इतका साधा निकष. अरे बोला ना, सामाजिक परिस्थितीवर.  सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोघांची तुलना करताना लोक केवळ एकाच बाबींचा उल्लेख का करतात ? दोघांच्या कारकिर्दीची तुलना करताना जात, सामाजिक स्थिती, आणि संधी हे मुद्दे विचारात घ्यायला नको का? सचिन हा उच्चवर्णीय ब्राह्मण कुटुंबातून येतो. लहानपणापासूनच क्रिकेटसाठी लागणारे सर्व प्रकारचे समर्थन आणि सोयी-सुविधा त्याच्यासाठी उपलब्ध होत्...