पुणे करार : एक अपयश
स्वतंत्र मतदारसंघाचे महत्व काय होते? त्याचा काय परिणाम झाला असता? पुणे करार का अनुत्पादक ठरला? यासारख्या कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आजचे आंबेडकरी विचारवंत आणि कार्यकर्ते गंभीर विचार करताना दिसत नाहीत. पुणे करारामुळे पहिल्या निवडणुकीत SC मतदारसंघावर कसा घात झाला , बाबासाहेबांनी त्या निवडणुकीचं विश्लेषण कसे केले आणि त्यांनी "Qualified Electorate" साठी का संघर्ष केला? याबद्दलही पुरेशी चर्चा कोणी करत नाही. बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीसाठी जंगजंग का पछाडले , कारण त्यांना पुणे कराराच्या मर्यादा आणि त्याचा धोका जाणवला होता. पुणे करारामुळे खऱ्या प्रतिनिधित्वाऐवजी कृत्रिम समावेशकता निर्माण झाली , ज्यामुळे दलित समाजाच्या प्रतिनिधित्वावर आघात झाला. बाबासाहेब हे जाणून होते की , आता "Qualified Electorate" हा एकमेव उपाय होता , जो समाजाच्या खऱ्या प्रतिनिधित्वाला योग्य दिशा देईल. मात्र , आजचे आंबेडकरी विचारवंत आणि चळवळीचे सदस्य या कोणत्याही प्रश्नांकडे अजिबात लक्ष देत नाहीत. यात दुसरी चिंताजनक गोष्ट म्हणजे , आज राजकारणाचे स्वरूप आणि चळवळीकडे पाहण्याचा दृष्टिको...