Posts

Showing posts from August, 2024

पाण्याच्या ग्लासात लपलेली जातीय असमानता

ब्राम्हण व्यक्तीने दलितांना पाणी देणे आणि त्याला "खरा भारत" असल्याचे सांगणे म्हणजे असमानतेला मान्यता देणे होय. ही कृती एकतर्फी आहे , ज्यात दलिताला केवळ स्वीकारणाऱ्याच्या भूमिकेत ठेवले जाते , देणाऱ्याच्या नाही. बघा मित्रांनो... जात कशी काम करते ते – याचाच अर्थ असा की , अद्यापही समाजात ब्राह्मणांना उच्च आणि दलितांना नीच मानले जात आहे आणि हे सामाजिक समतेच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. कॉंग्रेसची विचारधारा कधी सामाजिक तत्त्वांना धरून होती? उलट , अनेकदा ब्राह्मणवादी विचारांना अप्रत्यक्षपणे पोषण दिले गेले आहे आणि आजही असे Tweet करून दलितांना कायमस्वरूपी खालच्या स्थानावर ठेवले जाते. अरे , राहुल गांधीने ग्लास मध्ये पाणी टाकले नसते तर खर्गेनी काय पाणी पिले नसते का? हे असले विधान करून फक्त तुम्ही कॉंग्रेसच्या विचारधारेचे कौतुक केले. परंतु , आंबेडकरवादी विचारसरणीने दलित समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या संघर्षाची तुम्ही उपेक्षा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दलित समाजाने आपल्या हक्कांसाठी लढा दिला , ज्यामुळे त्यांना हा सन्मान आणि अधिकार प्राप्त झाला आणि हा सन्मान , अधिक...

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

कोलकता येथे झालेल्या घटनेचा निषेध म्हणून 'रीक्लेम द नाइट' प्रदर्शनाचे आयोजन मुंबई मध्ये हिरेनंदानी गार्डन्सच्या महिलांनी केले. परंतु, झाले काय इथल्या उच्चभ्रू महिलांनी जयभीम नगरच्या महिलांना या प्रदर्शनात सामील करून घेण्यास नकार दिला आणि कारणे काय सांगितले, तर "तुमची समस्या इथे उपस्थित असलेल्या समस्यांपेक्षा वेगळी आहे", "हिरेनंदानी गार्डन्सच्या निवासी महिलांनी हे प्रदर्शन विशेषत: हिरेनंदानी संकुलातील रहिवाशांसाठीच आहे. सगळीकडे घटनेचा निषेध होत असताना, जय भीम नगर स्लममधील महिलांनी या प्रदर्शनात सामील होण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना भेदभावाचा सामना करावा लागला. इतकेच नव्हे तर, या महिला रहिवाशांनी त्यांच्याकडून प्लाकार्डस् काढून घेतले आणि त्यांना प्रदर्शन स्थलावरून काढून टाकले.  विचार करा... महिला महिला जर महिलांच्या समस्येसाठी एकत्रित येऊन प्रदर्शन करत असतील, तर इथे जातीचा संबध यावा का? संपूर्ण महिला एक महिला म्हणून स्त्री समस्येसाठी झगडत असेल तर, परंतु दलित, वंचित महिलांकडे जातीय विषमतावादी दृष्टीने बघून त्यांना हाकलून लावले जाते.  खरंच, ह्या समस्या अशाने सुट...

बुद्ध आणि मैत्री...

बुद्ध आपल्या संघात मैत्री कशी असावी आणि ती कशी निभावावी पाहिजे , याबद्दल संघात विशेष मार्गदर्शन करीत. बुद्ध धम्माची शिकवण देताना बुद्ध म्हणत - "धम्म हा तेव्हाच सद्धम्म आहे जेव्हा तो अशी शिकवण देतो की करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक... " यावरून आपल्या लक्षात येईल की, बुद्ध केवळ 'करुणा' शिकवून थांबले नाहीत. करुणा म्हणजे प्राणिमात्रासंबंधी दया करणे होय. परंतु, बुद्धानी यापलीकडे जाऊन मैत्री शिकविली. मैत्री म्हणजे अखिल जीव-जातीसंबंधी प्राणिमात्रासंबंधी दयाभाव, करुणेपर्यंत जाऊन न थांबता, पुढे जाऊन अखिल प्राणिमात्राबद्दल मैत्रीची भावना ठेवली पाहिजे, अशी बुद्धांची शिकवण आहे. मैत्री संबंधी बोलताना बुद्ध भिक्खूंना म्हणतात - समजा, एक मनुष्य एक विहीर खोदण्यात पृथ्वीला खोदतो, तेव्हा पृथ्वी त्याच्यावर रागावते काय? भिक्खूंनी उत्तर दिले - "नाही भगवान" बुद्ध पुढे आणखी एक प्रश्न विचारतात, समजा, एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगवू लागला तर तो चित्र रंगवू शकेल असे तुम्हाला वाटते काय ?  "नाही, भन्ते !" "का नाही?" भिक्खू म्हणाले, "कारण हवेत अ...