मराठा आरक्षण...
मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे यात काही दुमतच नाही. परंतु, मराठा खरच स्वतःला मागासवर्गीय म्हणून घेण्यास तयार आहे का? कारण, आरक्षण मागासवर्गीय लोकांसाठी आहे. आरक्षण मिळाले तरीही गोरगरिबांना या आरक्षणाचा काहीही एक फायदा होणार नाही कारण आजही गरिबांना लुबाडणारा श्रीमंत वर्ग आहे. गरिबांच्या आरक्षणाचा फायदा श्रीमंत लोक घेणार नाहीत कशावरून? आरक्षण मिळाले तरीही गोरगरिबांना हे श्रीमंत मराठे फायदा होऊ देणार नाहीत. आरक्षण हे आर्थिक निकषावर दिले पाहिजे असा मुद्दा उपस्थित करत आहेत? आर्थिक निकषावर गरीब - श्रीमंत मराठे तुम्ही कसे ठरवणार? कारण,श्रीमंत मराठे आम्ही कसे गरीब मराठे आहोत हे सिद्ध करण्यासाठी धडपडणार व गरीब मराठ्यांची स्थिती जैसे थे राहण्याची पुन्हा एकदा दाट शक्यता आहे. मराठ्यांनी आजपर्यंत सर्व क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे मग श्रीमंत असणारे मराठे का गरीब मराठ्यांना पुढे घेऊन जात नाही? आजही श्रीमंत मराठ्यांच्या संस्था, कारखाने, शाळा कितीतरी बाबी आहेत. मी असेही श्रीमंत मराठे पाहिले, स्वतःच्या संस्था काढल्यात, व संस्थेतील कर्मचारी वर्ग संस्थेच्या मालकाच्या घरच्या फरश्या पुसण्याचे काम...