Posts

Showing posts from February, 2024

शिवाजी समजून घेताना...

शिवाजी महाराजांचा विचार केला तर, शिवाजी महाराजांचा इतिहास फार मोठा आहे. मध्ययुगीन भारतीय काळातील महाराष्ट्रातील, शिवाजी महाराजांचा हा एकमेव इतिहास आहे म्हटले तरी चालते. शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे, आवडते राजे आणि आराद्य दैवत. शिवाजी महाराजांचे, नाव घेतले की स्फूर्ती चढते. एक अभिमान, अंगात संचारतो. आपण, महाराष्ट्रीयन लोक शिवाजी महाराजांवर खूप गर्व करतो. शिवाजी महाराजांना, कुठे ठेवावे आणि कुठे नाही ठेवावे असे आपले होत असते. शिवाजी महाराज यांचेवर गर्व असणे चुकीचे आहे असे मी म्हणत नाही. पण आपण खरच जो शिवाजी महाराज ओळखायला पाहिजे तो ओळखला आहे काय?          शिवाजी महाराजांच्या, कर्तृत्वाचे आपण आपल्या परीने चित्र रंगविले आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. कारण, आपण त्यांना एकाच नजरेतून बघतो आहोत. खरंतर, हा ही मोठा प्रश्न आहे की, लोकशाही असणाऱ्या भारतात आपण शिवाजी महाराजांना आठवण्याचे कारण काय? आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय असणाऱ्या भारतात एका राजाचा काळ आठवणे, म्हणजे नक्किच काहीतरी त्या राजाचा काळ काहीतरी वेगळा असला पाहिजे. शिवाजी महाराज यांची प्रतिमा, ही एक प्रत...